मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी धनंजय पाटील गुरुजी यांची निवड : ग्रामस्थांकडून सत्कार
मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी धनंजय पाटील गुरुजी यांची निवड झाली असून ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज – mangalwedha news
मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित,मंगळवेढा यांच्या चेअरमनपदी धनंजय पाटील गुरुजी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे शिक्षक वर्गात व सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सत्कार समारंभप्रसंगी विद्यमान चेअरमन बबन म्हमाणे, सरपंच सचिन बोडके,माजी सरपंच सुनील सुडके, माजी उपसरपंच दीपक नरळे,मनोहर जुंदळे,लक्ष्मण म्हमाणे गुरुजी,पप्पु सुडके,चंद्रकांत सुडके, भिमराव जुंदळे,शालेय समिती सदस्य राजू कांबळे,माजी तंटामुक्त अध्यक्ष हनमंत जुंदळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी धनंजय पाटील गुरुजी यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षक बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी सकारात्मक व पारदर्शक कार्य होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
mangalwedha-teacher-patsanstha-chairman-dhananjay-patil-guruji
