रायझींग डे निमित्त पंढरपूर शहर पोलिसांची pandharpur police मोठी कामगिरी:सोनं-चांदी दागिने व ३५ मोटारसायकलींसह १३.६३ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

रायझींग डे निमित्त पंढरपूर शहर पोलिसांची pandharpur police मोठी कामगिरी:सोनं-चांदीचे दागिने व ३५ मोटारसायकलींसह १३.६३ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

रायझींग डेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत आरोपींकडून सोनं-चांदीचे दागिने आणि तब्बल ३५ मोटारसायकली जप्त केल्या. एकूण १३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. या कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

pandharpur police news पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ जानेवारी २०२६ : रायझींग डे च्या निमित्ताने पंढरपूर शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत सोनं-चांदीचे दागिने तसेच Rising Day Police Achievement मोटारसायकली चोरी करणाऱ्या आरोपींकडून १३,६३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो मूळ फिर्यादींना परत केला आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५७/२०२५ (भा.न्या.सं. २०२३ कलम ३०३(२)) अंतर्गत चोरीस गेलेले एकूण ८,८१,७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (१० तोळे) व चांदीच्या वस्तू (५०० ग्रॅम) Gold Silver Recovery News आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

तसेच गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८६/२०२५ (भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५(अ), ३३१(३), (४)) अंतर्गत चोरीस गेलेले ८२,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (२.२ तोळे) देखील आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहेत.

याशिवाय सन २०२५ अखेर चोरीस गेलेल्या एकूण ३५ मोटारसायकली motorcycle Recovery News जप्त करून त्या संबंधित फिर्यादींना परत देण्यात आल्या आहेत. दागिने व मोटारसायकली असा मिळून एकूण १३,६३,५०० रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला आहे.

ही कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व पोसई राजेश गोसावी, पोह सिरमा गोडसे,पोह विठ्ठल विभुते,पोह प्रसाद औटी,पोह सचिन हेंबाडे, पोना पकाले,पोका कपिल माने, पोशि शहाजी मंडले,पोकॉ बजरंग बिचुकले,पोकॉ दिपक नवले,पोकॉ दिपक नवले,चापोकॉ बडे तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण चे पोकॉ रतन जाधव यांनी ही कारवाई यशस्वी केली.

या प्रभावी कारवाईमुळे पंढरपूर शहर व परिसरात पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top