माघ यात्रेत वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग व मंदिर परिसरात अतिक्रमण नको : भाविकांच्या सोयींना प्राधान्य द्या – प्रांताधिकारी सचिन इथापे
पंढरपूर येथे २९ जानेवारी २०२६ रोजी माघ शुद्ध एकादशी असून २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान माघ यात्रा होणार आहे. या कालावधीत भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग व मंदिर परिसरात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
Pandharpur Magh Yatra 2026 पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०१ जानेवारी : माघ शुद्ध एकादशी २९ जानेवारी २०२६ रोजी होत असून, २३ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी या कालावधीत माघ यात्रा होणार आहे.Magh Shuddha Ekadashi या कालावधीत पंढरपूर शहरात तीन ते चार लाख भाविक दाखल होतात.त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी,अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.Pandharpur Temple News

माघवारीपूर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस कार्यकारी अभियंता अमित निमकर,तहसीलदार सचिन लंगुटे,मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजयकुमार सरडे,पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके,मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश आनेचा,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.ढोले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले की, यात्रा कालावधीत नगरपालिकेने शुद्ध व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,नदी पात्रातील वाळवंट व घाटांची स्वच्छता, तसेच ६५ एकर व नदीपात्रात तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करावी. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, पुरेसा वीजपुरवठा व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
मंदिर समितीने दर्शन रांग व दर्शन मंडपात आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही यासाठी अधिक सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी,अशा सूचनाही देण्यात आल्या.

आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा ठेवावा.पाटबंधारे विभागाने नदीपात्रात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध राहील याचे नियोजन करावे.नदीपात्रात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह यांत्रिक बोटी सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले.अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ व प्रसाद विक्री केंद्रांची नियमित तपासणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
नगरपालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा, स्वच्छता,तात्पुरती शौचालये व कचरा व्यवस्थापनाबाबतची माहिती पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले असल्याचे पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले.
मंदिर समितीने भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे यासाठी दर्शन मंडप व रांगांमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती लेखाधिकारी मुकेश आनेचा यांनी दिली.
