जगा आणि जगू द्या सामाजिक समरसतेचा उत्कृष्ट अविष्कार..प्रा.एन. डी.बिरनाळे
जगा आणि जगू द्या सामाजिक समरसतेचा उत्कृष्ट अविष्कार..प्रा.एन.डी.बिरनाळे सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज:कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणं,प्रत्येकाचं अस्तित्व मान्य करणं.. मैत्रभाव व सहिष्णुतेची जोपासना करणं.. सर्वांचा आदर करणं प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं म्हणजे समता भाव वृध्दीगंत करणं यालाच सामाजिक समरसता म्हणतात.छ.शिवाजी महाराज रयतेच्या सुख दुःखात सहभागी झाले.शोषण व पिळवणुकी तून महाराष्ट्र मुक्त केला.रयतेला…
