1996 च्या जीआर ची अमंलबजावणी लवकरात लवकर करावी- एसबीसी संघर्ष समिती

एसबीसी संघर्ष समितीच्यावतीने पंढरपूर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना आरक्षणासंदर्भात निवेदन

करकंब /मनोज पवार – SBC आरक्षण ५0% च्या आत बसविण्याबाबत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,मा.वि. मा.प्र.मंत्री यांना लिहीलेले निवेदन पंढरपूर तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच प्रांताधिकारी गजानन गुरव यांना पंढरपूर तालुका विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.

संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या
 एसबीसी चे आरक्षण 50 टक्क्यांच्या आत बसविणे , 1996 च्या जीआरची अंमलबजावणी लवकात लवकर व्हावी,एससी एसटीच्या सवलती जशास तशा एसबीसी प्रवर्गाला मिळाव्यात, क्रिमिलियरचे तत्व लागू असणार नाही, वस्त्रोद्योगाच्या सवलती योजना या पारंपारिक विणकरांना मिळाव्यात तसेच वस्त्रोद्योग खादी ग्राम उद्योग महामंडळावर विणकरांच्या नियुक्त्या कराव्यात, राजकीय व शैक्षणिक आरक्षण स्वतंत्रपणे असावे तसेच पदोन्नतीतही आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

 यावेळी पंढरपूर तालुका विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष जयंत टकले, चंद्रकांत रसाळ,अभिजीत टेके, धोंडीराम भाजीभाकरे, लोटके,हेमंत तारळकर, दत्तात्रय रेपाळ, वंशदिप शिंदे, गणेश टकले, बाळकृष्ण टेके, दत्ता शिंदे, आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: