महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीचा आणि इंदूमिल मधील स्मारक कामाचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आणि इंदूमिलमधील स्मारक कामाचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
     मुंबई दि.02/11/2021 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा आढावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी घेतला. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित आढावा बैठकीत ना. रामदास आठवले यांनी इंदूमिल मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा ही घेतला. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने यंदा दि. 6 डिसेंबरला शक्यतो चैत्यभूमीवर मोठी गर्दी करणे टाळून घरूनच महामानवाला अभिवादन करावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.यावेळी खा.राहुल शेवाळे हेही उपस्थित होते.या बैठकीला मुंबई शहर जिल्हा अधिकारी रुजू निवतकर; अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण , मुंबई मनपा, रेल्वे,आरोग्य विभागाचे अधिकारी, पूज्य भन्ते डॉ राहुल बोधी, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे,माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर,नागसेन कांबळे,दयाळ बहादूर,सिद्धार्थ कासारे, प्रकाश कमलाकर जाधव,रवी गरुड,रतन अस्वारे आदी मान्यवर उपस्थित होते.

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर ला चैत्यभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना कोरोना रोखण्याचे नियम पाळून गर्दी न करता दर्शनाची परवानगी द्यावी. तसेच आंबेडकरी अनुयायांना  कोविड प्रतिबंधक लस देण्याची सुविधा मनपा ने करावी अशी या बैठकीत सूचना ना. रामदास आठवले यांनी केली. 

  अद्याप कोरोनाचे संकट संपूर्ण दूर झाले नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे 6 डिसेंबर चैत्यभूमी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो लोकांनी गर्दी केली तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण दिल्यासारखे होईल. त्यामुळे जीव धोक्यात घालून यंदा मोठी गर्दी न करता संयम ठेऊन कोरोनाचा समूळ नायनाट झाल्यानंतर पुढील वर्षी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेने अभिवादनासाठी यावे.यंदा चैत्यभूमीवरील कार्यक्रमाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे. 

यावेळी इंदूमिलमधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कामाचा आढावा ना.रामदास आठवले यांनी घेतला. त्यातील डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एक बुद्धमूर्ती असून त्यात वाढ करून पुतळ्या भोवती आणखी 5 बुद्धमूर्ती उभारण्याची सुचना ना. रामदास आठवले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: