ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळंच वळण; समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी, शिवप्रतिमा भेट देऊन सन्मान


हायलाइट्स:

  • ड्रग्ज प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांना वेगळं वळण
  • हिंदुत्ववादी संघटना समीर वानखेडेंच्या बाजूनं मैदानात
  • एनसीबी कार्यालयासमोर केला वानखेडेंचा सत्कार

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात बनावट कारवायांचे आरोप झाल्यामुळं वादात अडकलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता हिंदुत्ववादी संघटना पुढं येऊ लागल्या आहेत. ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान’ या संघटनेनं आज एनसीबीच्या कार्यासमोर समीर वानखेडे यांचा जाहीर सत्कार केला. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली. (Sameer Wankhede Vs Nawab Malik)

कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणातील कारवाईनंतर समीर वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही कारवाई बोगस असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी त्यांनी काही पुरावे देखील दिले होते. समीर वानखेडे हे खंडणी वसुलीसाठी निष्पाप लोकांना ड्रग्ज प्रकरणात अडकवतात. भाजपच्या काही लोकांची त्यांना साथ आहे, असा दावाही मलिक यांनी केला होता. मात्र, नवाब मलिक हे त्यांचे जावई समीर खान व आर्यन खान यांच्यावर कारवाई झाल्यामुळं असले आरोप करत असल्याचं भाजपनं म्हटलं होतं. काही नेत्यांनी नवाब यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना या संपूर्ण प्रकरणाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धार्मिक पार्श्वभूमीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं आणखी खळबळ उडाली होती.

वाचा: अशोक चव्हाणांचे राजकीय वजन वाढले; देगलूर विजयानंतर थेट दिल्लीतून फोन

आता काही हिंदुत्ववादी संघटनांनी समीर वानखेडे यांची पाठराखण सुरू केली आहे. ‘शिवप्रतिष्ठान’ नावाच्या संघटनेनं आज थेट एनसीबी कार्यालयासमोर धडक देत समीर वानखेडे यांचा सत्कार केला. वानखेडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. वानखेडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं ‘शिवप्रतिष्ठान’चे नितीन चौगुले यांनी सांगितलं. ‘नवाब मलिक हे वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करत आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या मंत्र्यांना आमचा विरोध आहे. त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करत राहू, असंही चौगुले यांनी सांगितलं.

वाचा: अनिल देशमुखांच्या अटकेचे ट्वीट दोन तास आधीच; भाजप समर्थकाच्या ट्वीटनं गोंधळ वाढलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: