पंढरपूरातील खाजगी रुग्णांलयातील बिलांची तपासणी लाखो रुपये केले कमी

पंढरपूरातील 15 खाजगी रुग्णांलयातील 540 बिलांची तपासणी 7 लाख 3 हजार 700 रुपये केले कमी Lakhs of rupees were spent on checking the bills of private hospitals in Pandharpur
  पंढरपूर ,18/05/2021- कोरोना बाधित रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब व गरजू रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळावेत यासाठी  शासनाने उपचारासाठी आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित केली आहे.अद्यापही काही खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून निश्चित केलेल्या दरापेक्षा आधिक दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याने नियुक्त केलेल्या लेखापरिक्षण पथकामार्फत शहरातील 15 खाजगी रुग्णांलयातील  540  बिलांची तपासणी करुन 7 लाख 3 हजार 700 रुपये कमी करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

    तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत या साठी प्रशासनाकडून पंढरपूर तालुक्यात 19 डेडीकेडेड कोविड हॉस्पिटल व डेडीकेडेड कोविड हेल्थ सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या उपचारासाठी चाचणी तसेच रुग्णालयातील उपचाराबाबत रक्कम निश्चित केली असतानाही खाजगी रुग्णालयाकडून जादा बिलाची आकारणी केली जात असल्याची तक्रारी येत आहेत. खाजगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आकारणी करावी असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.   

  गरीब व गरजू रुग्णांचे हित डोळ्यासमोर ठेवून खाजगी रुग्णालयांनी जास्तीत-जास्त गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही लाभ मिळवून द्यावा असे,आवाहनही श्री.ढोले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: