‘एसबीआय’ला बंपर नफा ; दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ६६ टक्के वाढ, विक्रमी कमाई


हायलाइट्स:

  • भारतीय स्टेट बँकेला दुसऱ्या तिमाहीत ७६२६.६ कोटींचा नफा झाला आहे.
  • बँकेच्या नफ्यात यंदा ६६.७ टक्के वाढ झाली आहे.
  • अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी झाले असल्याने बँकेला दिलासा मिळाला आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ७६२६.६ कोटींचा नफा झाला आहे. बँकेच्या नफ्यात यंदा ६६.७ टक्के वाढ झाली आहे. एका तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक नफा नोंदवलेल्या ‘एसबीआय‘च्या या दमदार कामगिरीने बँकिंग व्यवस्था करोना संकटातून सावरली असल्याचे अधोरेखित झाले आहे.

PF खात्यात ८.५ टक्के दराने जमा होणार पैसे;मिस्ड कॉल आणि SMS द्वारे अशी तपासा शिल्लक
एसबीआयला २०२०-२१ मधील दुसऱ्या तिमाहीत ४५७४ कोटींचा नफा झाला होता. तर चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ३० जून २०२१ अखेर बँकेला ६५०४ कोटींचा नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत बँकेने व्याजातून मिळवलेले उत्पन्न आणि खर्च याचे प्रमाण १०.६ टक्क्यांपर्यंत वाढले असून ते ३११८४ कोटींपर्यंत गेले.

सणासुदीत किंचित दिलासा; सात दिवस दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
याच तिमाहीत बँकेने नेट इंटरेस्ट मार्जिन ०.१६ टक्क्यांनी वाढले असून ते ३.५० टक्के झाले आहे. बँकेचा परिचालन नफा १८०७९ कोटींवर गेला आहे. त्यात ९.८४ टक्के वाढ झाली.

मुहूर्ताला सोनं झालं स्वस्त! जाणून घ्या आजचा सोने चांदीचा भाव
दरम्यान याच तिमाहीत अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी झाले असल्याने बँकेला दिलासा मिळाला आहे. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ४.९० टक्के झाले आहे. जूनच्या तिमाहीत एनपीए ५.३२ टक्के होता. तर गेली यावर्षी दुसऱ्या तिमाहीत एनपीए ५.२८ टक्के होता. बुडीत कर्जांसाठी बँकेने दुसऱ्या तिमाहीत २६९९ कोटींची तरतूद केली. हे प्रमाण तब्बल ५५ टक्क्यांनी कमी झाले. किरकोळ कर्ज वितरणात ६.१ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे बँकेने म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: