भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या सोलापूर जिल्हा प्रभारीपदी अजित संचेती
भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या सोलापूर जिल्हा प्रभारीपदी अजित संचेती यांची निवड Ajit Sancheti elected as Solapur district in-charge of BRP
पुणे, 18/05/2021- 15 जून 2019 मध्ये अजित संचेती यांनी भारतीय राष्ट्रवादी पार्टी मध्ये प्रवेश केला.पक्षाने त्यांच्यावर युवा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्र,खान्देश,मराठवाडा,विदर्भ येथे आपल्या पार्टीची छाप उमटली आणि पक्ष वाढीस सुरवात केली.
सुरवात केल्यानंतर लगेच आलेल्या महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुकीमध्ये पार्टीने महाराष्ट्रमधील पहिलीच निवडणूक लढवली. यात अजित संचेती यांना चिंचवड विधानसभा मतदार संघामधून पक्षाची उमेदवारी दिली गेली.अजित संचेती यांची ही पहिलीच निवडणूक होती आणि त्यांनी 4 थ्या क्रमांकाची मते मिळवली.
हे करत असतानाच पार्टीने संपर्क प्रमुख व नव्यानेच सुरू केलेला विभाग भारतीय राष्ट्रवादी चित्रपट सेना याचाही कार्यभार देण्यात आला. आता सोलापूर जिल्हयात पक्षवाढीसाठी जिल्ह्याचा प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे प्रदेशाध्यक्ष मनीष दाभाडे यांनी जाहीर केले आहे.
पत्रकारांकडे मनोगत व्यक्त करताना अजित संचेती म्हणाले की ,सोलापूर जिल्हामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कामगारांच्या अडीअडचणी,बेरोजगार युवकांना हाताला काम मिळण्यासाठी एमआयडिसी साठी,महिलांना सुरक्षितता प्रदान करुन घरगुती उद्योग समूह स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी तेथील तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना एकत्र आणून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करून भारतीय राष्ट्रवादी पार्टीची ताकत वाढवणार आहे.