सारा तेंडुलकर आणि शुभमनचे ब्रेकअप? क्रिकेटपटूने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट


नवी दिल्ली: युएईमध्ये सध्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरू आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा क्रिकेटपटू शुभमन गिल याची निवड करण्यात आलेली नाही. आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या सत्रानंतर गिल भारतात परतला. सध्या तो कुटुंबियांसोबत वेळ घालवतोय. अशात शुभमनची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

वाचा- हार्दिक, भुवीला डच्चू; विराटबाबत BCCI दोन दिवसा घेणार मोठा निर्णय

शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेकांना त्याच्यात काही तरी सुरू असल्याचे वाटते. आता शुभमनने केलेल्या पोस्टचा संबंध साराशी जोडला जात आहे. शुभमन आणि सारा हे सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट लाईक करत असताता. सारा इस्टाग्रामवर शुभमन आणि त्याच्या बहिणीला फॉलो करते . सारा आणि शुभमन यांनी अनेकदा एकसारख्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यावरून चाहत्यांना दोघांच्यात अफेअर सुरू असल्याचे वाटते.

वाचा- विराट आणि रोहितला बसला आणखी एक झटका; पाहा पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केले

शुभमनने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने जी गोष्ट म्हटली आहे त्यावरून अनेकांनी त्याचा संबंध साराशी जोडलाय. शुभमनने इस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील टी शर्टवर म्हटले आहे की, परींच्या प्रेमात पडू नका. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये Sigma rule no.1 असे म्हटले आहे.


वाचा- टीम इंडियामध्ये दोन गट – एक कोहलीसोबत दुसरा त्याच्याविरोधात; शोएब अख्तरचा दावा

गिलच्या या पोस्टचा अर्थ चाहत्यांनी असा लावला आहे की, सारा तेंडुलकरसोबत त्याचे ब्रेकअप झाले. अनेकांनी कमेंटमध्ये त्याला थेट तसा प्रश्न देखील विचारला आहे. आता शुभमनने ही पोस्ट नेमकी का आणि कशासाठी शेअर केली आहे याचे उत्तर तोच देऊ शकतो. शुभमनने आतापर्यंत भारताकडून वनडे आणि कसोटी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ८ कसोटीत ४१४ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१ मध्ये त्याने शानदार कामगिरी केली होती.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: