मुंढेवाडीत ग्रामपंचायत व स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारले कोविड केअर सेंटर

मुंढेवाडीत ग्रामपंचायत व स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारले कोविड केअर सेंटर Covid Care Center was set up at Mundhewadi jointly by Gram Panchayat and Sveri
   पंढरपूर- कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या पाहता उपचारासाठी रुग्णांची हेळसांड होऊ नये व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गावातच उपचार मिळण्याची सोय व्हावी या हेतूने मुंढेवाडी ता.पंढरपूर मध्ये दि.१६ मे रोजी मुंढेवाडी ग्रामपंचायत व श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गोपाळपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २० बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मुंढेवाडी च्या सरपंच सौ.सुजाता भास्कर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

   मुंढेवाडी व परिसरातील रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होण्यासाठी व कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने उपचारासाठी रुग्णांची धावपळ होऊ नये आणि त्वरित उपचार मिळावेत यासाठी मुंढेवाडीमध्ये ग्रामपंचायत आणि तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. 

या प्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम. एम.पवार यांच्यासह मुंढेवाडीचे उपसरपंच पारूबाई घाडगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महादेव मोरे व इतर ग्रामपंचायत सदस्य, युवक नेते सचिन मोरे,महादेव मोरे,सुधीर मोरे,विशाल मोरे,शशिकांत बिस्किटे यांच्यासह नागरिक,आरोग्य सेवक,आशा वर्कर्स ,ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: