‘दिवाळी आज, पण पाडवा १ जानेवारीला होणार’; किरीट सोमय्यांनी केली ‘ही’ घोषणा


हायलाइट्स:

  • आता प्रत्येक आठवड्याला आपण एकेक मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- किरीट सोमय्या.
  • दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र १ जानेवारीला असणार आहे- किरीट सोमय्या.
  • ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० चोरांचे घोटाळे बाहेर काढून १ जानेवारीला महाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार- सोमय्या.

मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याला १ जानेवारीपर्यंत भ्रष्टाचार मुक्त (Corruption free Maharashtra) करण्याची घोषणा करतानाच दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र १ जानेवारीला असणार आहे, असे सूचक वक्तव्य केले आहे. सोमय्या यांनी आज एका दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर ते बोलत होते. (bjp leader kirit somaiya has announced that maharashtra will be free from corruption by january 1)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांचे ३१ डिसेंबरपर्यंत करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. याचाच अर्थ भारत १ जानेवारी रोजी कोविडमुक्त होणार आहे, असे सांगतानाच आता ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० चोरांचे घोटाळे बाहेर काढून १ जानेवारीला महाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार. आज दिवाळी आहे, मात्र पाडवा १ जानेवारीला असेल, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- सॅम डिसूझाला धक्का; हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला, ‘हे’ कारण

‘अनिल परब शुद्धीत नव्हते’

ज्या वेळी ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी केली, त्यावेळी ते शुद्धीत नव्हते, असे म्हणत अनिल परब यांनी ईडीला काय कबुली दिली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती आहे का?, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.

४० चोरांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगताना सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सिंग यांच्यावर १७ प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. मग त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात काय लिहिले आहे हे गांभिर्याने कशाला घेता?, असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे.

क्लिक करा आणि वाचा- आता तुम्हीच घरबसल्या मोजू शकता गोंगाट!; नीरीचे ‘नॉईज ट्रॅकर अ‍ॅप’

‘ती संपत्ती अजित पवार यांचीच’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचे सोमय्या यांनी पुन्हा एकदा सांगितले. अजित पवार यांची ही संपत्ती बेनामी असून त्यांचे नाव नसले तरी सर्व संपत्ती त्यांचीच आहे, असे सोमय्या म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘आम्हीही नको ती अंडी उबवली’, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नीलेश राणेंचा प्रहारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: