Sharad Pawar: बारामतीतून खास बातमी; शरद पवार यंदा पाडव्याला शुभेच्छा स्वीकारणार, पण…


हायलाइट्स:

  • शरद पवार यंदा पाडव्याला कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार.
  • गोविंदबाग ऐवजी अप्पासाहेब पवार ऑडिटोरिअममध्ये कार्यक्रम.
  • गर्दी टाळण्याचे व पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न आणण्याचे आवाहन.

पुणे: राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यंदा बारामती येथे दिवाळी पाडव्यादिवशी कार्यकर्त्यांना भेटणार की नाहीत, याबाबत उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. बारामतीत दर पाडव्याला होणारा हा आनंद सोहळा यंदा होणार आहे मात्र त्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. ( Sharad Pawar Diwali Latest News )

वाचा:आता करानामुक्तीकडे जायचंय!; दिवाळीच्या शुभेच्छा देताना अजित पवार म्हणाले…

गेल्या दिवाळीत कोविडची स्थिती गंभीर होती. त्यामुळे दिवाळी साधेपणाने साजरी करण्यात आली होती व अनेक निर्बंधही लावण्यात आले होते. यंदा मात्र कोविड स्थिती नियंत्रणात आहे व दिवाळीआधीच मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे सकारात्मक चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिवाळी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. हे एकंदर चित्र ध्यानात घेत बारामतीत दरवर्षी होणारा पाडवा सोहळा यंदा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे नियोजनही करण्यात आले आहे. गेल्या दिवाळीला हा सोहळा रद्द करण्यात आला होता.

वाचा:‘मी लस घेणार नाही, पण…’; इंदुरीकर यांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

गर्दी करू नका, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नका

दिवाळी पाडव्याला शरद पवार व कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी बारामती येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने पवार समर्थक आणि कार्यकर्ते येतात. या सर्वांना महत्त्वाचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. करोनाची सद्यस्थिती विचारात घेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे, या हेतुने समस्त पवार कुटुंबीय उद्या शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी गोविंदबाग ऐवजी लगतच्या अप्पासाहेब पवार ऑडिटोरिअममध्ये शुभेच्छुकांना भेटतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संसर्गाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नसल्याने भेटीसाठी येताना प्रत्येकाने व्यवस्थित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दी करू नये, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नयेत, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पवारांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

‘यंदाच्या दीपावलीत आपले जीवन सकारात्मकतेच्या प्रकाशाने उजळून निघावे, नवी स्वप्ने, नवी उमेद, नव क्षितीजे गाठण्याच्या आपल्या ध्येयासक्त प्रयत्नांना दिव्य यशाची झळाळी प्राप्त व्हावी ही मनोकामना. दीपावलीच्या आनंदमयी, तेजोमय पर्वानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा!’, अशा शब्दांत शरद पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा:CCTV फुटेजमध्ये दिसली शाहरुखच्या मॅनेजरची कार, ‘ती’ महिला कोण?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: