भाजीपाला व्यापारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपये

भाजीपाला व्यापारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपये 11 lakh for CM Assistance Fund on behalf of Vegetable Traders Federation

मुंबई,दि १९ – नवी मुंबई,वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने कोविड-१९ च्या उपचाराकरिता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली.

आज मंत्रालयात नवी मुंबई, वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे संचालक, अध्यक्ष, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी व कोरोनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर व इतर सर्व औषधांची मोठ्या प्रमाणात शासन उपाययोजना करीत आहे.

यापूर्वी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत आज नवी मुंबई,वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने ११ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

 यावेळी संचालक शंकर पिंगळे,अध्यक्ष कैलास ताजणे, प्रतिनिधी बाळासाहेब जाधव,भाऊसाहेब भोर आदीसह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई,वाशी भाजीपाला मार्केट येथील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे आभार मानले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: