फलटण शहरात कोविड सेंटरमध्ये अवतरला माणसातला देव माणूस

फलटण शहरात कोविड सेंटरमध्ये अवतरला माणसातला देव माणूस Man of God incarnated in Covid Center in the city of Phaltan

फलटण,प्रतिनिधी-फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल उत्कर्ष येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या प्रयत्नातून कै.लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर हे कोविड सेंटर सुरू केले आहे.फलटण तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले आहेत.फलटण तालुक्यातील रुग्णांना कोठेही बेड उपलब्ध होत नाहीत व गेल्या काही दिवसांपूर्वी आँक्सिजन बेड मिळत नसल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या तालुक्यातील व मतदार संघातील रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी स्वतः कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरमध्ये फलटण नगरपरिषदेचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांनी आपला मुक्काम ठोकला आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की फलटण नगरपरिषदचे नगरसेवक अनुप शहा हे स्वतः मधुमेह व हृदयविकार रुग्ण आहेत तरीही लोकांच्या मदतीला जात आहेत.त्यामुळे रुग्णांच्या  मदतीसाठी धावून जाणारा देवमाणूस अनुप शहा अशा शब्दात लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर या कोविड सेंटरमधील रुग्णांनी त्यांचा उल्लेख केला. 

  माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या कोविड सेंटरमध्ये जातीने लक्ष घालत आहेत.असेच कोवीड सेंटर माढा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यात सुरू करण्यात यावे अशी मागणी कोव्हिड रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.कारण सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आँक्सिजन बेड कमी पडत आहेत.

 अनुप शहा यांना या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर या नात्याने डॉ.मोहित म्हात्रे यांनी खंबीरपणे लाख मोलाची साथ दिली असून आपल्याकडून समाजाचे काही देणं लागतो अशा भावनेतून ते कै.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कोविड सेंटरमध्ये लोकांना उपचार देत आहेत.

   नगरसेवक अनुप शहा व डॉ.मोहित म्हात्रे हे आपल्याकडे असलेल्या कोविड बाधित रुग्णांना आपल्याला कोविड झाला आहे परंतु आपण यावरती मात करायची आहे असे सांगतात. त्यांना त्यांचे मनोबल वाढण्यासाठी दररोज सायंकाळी १५ मिनिटे योगा त्यानंतर भजन व प्रवचन असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी कोविड सेंटर मध्ये चालू केले आहेत.दिनांक १८ मे रोजी भजनासाठी प.पू.शामराजदादा जामोदेकर तसेच प.पू.गोविंद राजदादा लांडगे यांनी प्रवचन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: