मुकेश अंबानींनाही ‘सेकंड होम’ची भुरळ! ‘या’ देशात ३०० एकर प्राॅपर्टीची खरेदी, नव्या घरी दिवाळीचा जल्लोष


हायलाइट्स:

  • मुकेश अंबानी यांनी सेकंड होमसाठी लंडन शहराची निवड केली आहे.
  • लंडनमधील बकिंगहॅमशायर परिसरात अंबानी यांनी ३०० एकर प्रापर्टी खरेदी केली आहे.

मुंबई : आशियातील श्रीमंत उद्योजक रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सेकंड होमसाठी लंडन शहराची निवड केली आहे. लंडनमधील बकिंगहॅमशायर परिसरात अंबानी यांनी ३०० एकर प्रापर्टी खरेदी केली आहे. अंबानी कुटुंबीय लंडनमध्येच असून येथेच दिवाळी साजरी करणार असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. तर सहा महिने भारतात आणि सहा महिने लंडनमध्ये राहण्याचा अंबानी कुटुंबियांचा बेत आहे.

फास्टफूड क्षेत्रात गुंतवणूक संधी; सफायर फूड्स इंडिया लिमिटेडचा २०७३ कोटींचा IPO
दक्षिण मुंबईतील अँटिलीया या निवास्थान संपूर्ण लॉकडाऊन व्यतीत केल्यानंतर अंबानी कुटुंबियांना सेकंड होमची प्रकर्षाने जाणीव झाली असल्याचे सूत्रांची म्हटलं आहे. बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क या ३०० एकरात अंबानी यांचे दुसरे आलिशान घर आहे. या प्रॉपर्टीसाठी तब्बल ५९२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा ‘मिड डे’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृतात करण्यात आला आहे.

सकारात्मक सुरवात; लक्ष्मीपूजनानंतर सोने-चांदीला तेजीची झळाळी, जाणून घ्या आजचा भाव
अंबानी यांनी खरेदी केलेली प्रॉपर्टी १९०८ पर्यंत एक खाजगी मालमत्ता होती, ज्यानंतर तिचे कंट्री क्लबमध्ये रुपांतर करण्यात आलं. या मालमत्तेमध्ये एक आलिशान हॉटेल आणि गोल्फ कोर्स आहे. हॉलिवुडमधील जेम्स बाँडवरील सिनेमांमध्येही या प्रॉपर्टीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या भव्य वास्तूत सध्या अंबानी कुटुंबिय दिवाळी साजरी करत आहेत.

केंद्राची इंधनावर शुल्क कपात; पेट्रोल-डिझेल दरांबाबत आज कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
स्टोक पार्कमध्ये आलिशान सुविधांसह ४९ खासगी रूम असतील. तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेने सुसज्ज यंत्रणा या ठिकाणी असेल. येथे ब्रिटीश डाॅक्टरांचा चमू २४ तास उपलब्ध असेल. अंबानी कुटुंबाने नव्या निवासस्थानी मंदिरही उभारलं असून मुंबईतून दोन पुजारी नेले जाणार असल्याची माहिती आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून अंबानी कुटुंबीय मुंबईत नाही. ते लंडनमध्ये नव्या निवासस्थानी असून त्यांनी तेथेच दिवाळी साजरी करणार असल्याचे बोलले जाते. अंबानी कुटुंबिय लवकरच मायदेशी परतणार आहेत. त्यानंतर पुन्हा ते एप्रिलमध्ये लंडनला रवना होतील, असे या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या सेंकड होम बाबत अंबानी कुटुंबियांकडून किंवा रिलायन्स समूहाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: