माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांची दीपक जगताप यांच्या अंजीर बागेस भेट

माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांची दीपक जगताप यांच्या अंजीर बागेस भेट

बारामती – शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार sharad pawar यांनी अनपेक्षित निंबूत ता.बारामती येथे दीपक जगताप यांच्या अंजीर बागेस स्वतः होऊन भेट दिली .जेष्ठ नेते खा.शरद पवार दीपावली पर्वात बारामती येथे असतात.

निंबूत ता.बारामती जि.पुणे येथे दीपक विनायक जगताप या तरुण प्रगतशील शेतकऱ्यांने गेले सहा सात वर्षापासून अंजीर बाग जोपासलेली आहे . या बागेची माहिती खा.शरद पवार यांचे कानावर येत होती.खा.शरद पवार यांनी आज ठरवून प्राधान्य देऊन अनपेक्षित भेट देण्यासाठी येत असल्याचे सूचित केले .

   कोणताही लवाजमा न घेता खा.शरद पवार निंबूत ता.बारामती जि.पुणे येथे दीपक विनायक जगताप यांच्या अंजीर बागेत प्रत्यक्षात भेट देण्यासाठी गेले . सुमारे दोन अडीच तास बागेत घालवले.सूक्ष्म निरीक्षण,परीक्षण व अवलोकन केले .दीपक जगताप यांचेकडून समजावून ,प्रश्न विचारून सखोल माहिती घेतली.

जमीन खडकाळ, परिश्रम घेऊन लागवडीसाठी तयार केलेली बारामती तालुक्यातील अंजीर  बागेसाठी दिवंगत शास्त्रज्ञ डॉ.विकास खैरे यांचे सुरवातीपासून तांत्रिक मार्गदर्शन तसेच कृषी परिवार संस्थापक कृषीरत्न आनंद कोठडीया यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे दीपक जगताप यांनी सांगितले. शासकीय कृषी खात्याचे विक्री व्यवस्था संदर्भात सहकार्य लाभले असून उद्यान पंडित पुरस्कार प्रस्ताव व शिफारस ही ना.अजित पवार यांनी केली. शासनाने उद्यान पंडित पुरस्कार जाहीर केला.कोल्हापूर येथे अंजीर विक्रीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या बागेमध्ये आई,वडील,भाऊ,पत्नी,भावजय असे सर्वजणच राबत आहेत. 

श्रमाचे कौतुक झालं
शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल जाणणारे जाणता राजा खा.शरद पवार यांनी वेळ काढून पाठीवर हात ठेऊन भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे असे सूचित केले यामुळे माझ्या श्रमाचे कौतुक झालं असे दीपक जगताप यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: