Team India : भारतीय संघाचा सात षटकांमध्येच दणदणीत विजय, स्कॉटलंडचे केले वस्त्रहरण…


दुबई : भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आज सर्वात मोठे पाऊल टाकले. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत स्कॉटलंडला ८५ धावांमध्येच ऑलआऊट करत भारताच्या विजयाचा पाया रचला. हा सामना जिंकण्यासाठी भारताला १२ षटकांचे समीकरण देण्यात आले होते. भारताच्या फलंदाजांनी यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत हे आव्हान पूर्ण केले आणि दणदणीत विजय साकारला. लोकेश राहुलने यावेळी फक्त १९ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली, तर रोहित शर्माने १६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावा केल्या.

स्कॉटलंडच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. रोहित आणि राहुल यांनी धमाकेदार फटकेबाजी करत भारताला यावेळी चौथ्या षटकात अर्धशतक पूर्ण करून दिले. या दोघांनी चौकार आणि षटकारांची अतिषबाजी करत भारताची धावसंख्या जलदगतीने वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच भारताला कमी षटकांमध्ये हा विजय साकारता आला. पण रोहित शर्मा आणि अर्धशतकवीर लोकेश राहुल यावेळी बाद झाले, पण भारताने यावेळी ९ विकेट्स राखत दमदार विजय साकारला.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी स्कॉटलंडला तिसऱ्या षटकात पहिलाच धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद शमीने स्कॉटलंडच्या दुसऱ्या सलामीवीराला बाद केले. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यावर रवींद्र जडेजाने स्कॉटलंडच्या संघाला तिहेरी धक्के दिले. जडेजाने यावेळी स्कॉटटलंडच्या मधल्या फळीतील तीन फलंदाजांना स्वस्तात बाद केले आणि भारताला घवघवीत यश मिळवून दिले. भारताने स्कॉटलंडचा अर्धा संघ गारद केला तेव्हा त्यांची ५ बाद ५८ अशी अवस्था झाली होती. जडेजाना या सामन्यात चार षटकांमध्ये फक्त १५ धावा देत तीन विकेट्स पटकावल्या. जडेजानंतर भारताचा दुसरा फिरकीपटू आर. अश्विनने स्कॉटलंडला सहावा धक्का दिला. भारताच्या गोलंदाजांची एकामागून एक ठराविक फरकाने न्यूझीलंडच्या संघाला धक्के दिले. त्यामुळेच स्कॉटलंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कारण स्कॉटलंडचा एकही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर टीकून राहू शकला नाही. त्यामुळे या सामन्यात स्कॉटलंडला चांगल्या भागीदाऱ्याही करता आल्या नाहीत. त्यामुळे स्कॉटलंडच्या संघाला यावेळी फक्त ८५ धावाच करता आल्या. भारताकडून रवींद्र जडेजाबरोबरच मोहम्मद शमीनेही तीन विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराने यावेळी दोन आणि आर. अश्विनने यावेळी एक विकेट मिळवली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: