IND v SCO : स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात एकमेव मोठा बदल, पाहा कोणाला संधी मिळाली


दुबई : स्कॉटलंडविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आहे. भारताने नाणफेक जिंरत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने या सामन्यासाठी संघात एक मोठा बदल केला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघातून शार्दुल ठाकूरला डच्चू दिला आहे. कारण आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये शार्दुलला चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. शार्दुलच्या जागी भारतीय संघात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे.

भारताने अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. विजय मिळवल्यावर शक्यतो संघात बदल केले जात नाहीत. पण भारताच्या फलंदाजी क्रमाममध्ये मात्र नक्कीच बदल होऊ शकतो. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीला आले होते. पण दुसऱ्या सामन्यात इशान किशनला सलामीला पाठवत रोहित शर्माला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते. या सामन्यात कोहली चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी क्रमामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. तिसऱ्या सामन्यात रोहित आणि राहुल सलामीला आले असले तरी कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला नव्हता. या सामन्यात कोहली फलंदाजीलाच आला नसल्याचे पाहायला मिळाले. कारण तिसऱ्या स्थानावर रिषभ पंतला बढती देण्यात आली होती, तर चौथ्या स्थानावर हार्दिक पंड्या खेळायला आला होता. चौथ्या सामन्यातही भारतीय संघात परिस्थितीनुसार बदल करण्यात येऊ शकतो. तिसऱ्या सामन्यात जलदगतीने धावा करायच्या होत्या, त्यामुळे रिषभ आणि हार्दिक यांना बढती दिली होती. आता स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात संघात कोणता बदल होईल, असे दिसत नसले तरी फलंदाजी क्रमवारीत नक्कीच बदल पाहायला मिळू शकतात. चौथ्या सामन्यात सूर्यकुमार यादवला बढती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या विश्वचषकात त्याला जास्त संधी मिळालेली नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजीला येऊ शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या फलंदाजीचा क्रम कसा असेल, याचू उत्सुकता सर्वांना असेल.

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भाताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी संघात बदल करण्याबाबत सल्ला दिला दिला होता. गावस्कर यांनी सांगितले होते की, ” स्कॉटलंडच्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळण्यात समस्या जाणवू शकते. कारण स्कॉटलंडने आतापर्यंत जास्त चांगल्या फिरकी गोलंदाजीचा सामना केलेला नाही. त्यामुळे भारतीय संघात जर आज तीन फिरकी गोलंदाजांना संधी देण्याचा विचार चांगला असू शकतो. त्याचबरोबर लेग स्पिनर हा सर्वात महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. कारण लेग स्पिनरचा चेंडू हा फलंदाजाच्या डोळ्याच्या वरून जास्त उंचीवरून येतो. त्यामुळे फलंदाजांना लेग स्पिनरचा सामना करणे सोपे नसते.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: