कुर्डुवाडीत आँक्सीजन प्लांट उभारावा – डाॅ विलास मेहता

कुर्डुवाडीत आँक्सीजन प्लांट उभारावा – डाॅ विलास मेहता Oxygen plant should be set up in Kurduwadi – Dr.Vilas Mehta
 कुर्डुवाडी / राहुल धोका - कुर्डुवाडी शहरातील  जेष्ठ शिवसौनिक डाॅ विलास मेहता यांनी कुर्डुवाडी येथील एम.आय.डी.सी येथे आँक्सीजन प्लांट उभारण्याची मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निवेदनाद्वारे केली आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आँक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.जर एमआयडीसी मध्ये शासकीय अथवा खाजगी ऑक्सीजन प्लान्ट उभा करण्यासाठी उद्योगपतीस प्रवृत्त केले किंवा शासन प्रकल्प मंजूर करून घेतला तर यामुळे सोलापूर जिल्हाचा ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न निश्चित सुटणार आहे .

कुर्डुवाडी येथे एका झालेल्या पत्रकार परिषदेत एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग उभा करु असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले होते असे यात नमुद करण्यात आले आहे.

कुर्डुवाडी एमआयडीसी मध्ये जागा ही मुबलक असुन शासकिय अथवा खाजगी आँक्सीजन प्लांट उभा करावा अशी मागणी केली आहे.

 या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,  उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे ,राजेश टोपे आरोग्य मंत्री यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: