६ अभिनेत्रींसोबत विराटचं अफेयर; ब्राझिलियन मॉडेलच्या प्रेमात बुडाला होता ‘चिकू भैय्या’


पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील करोडो चाहते त्याच्यावर सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे आपल्या आवडत्या खेळाडूवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. क्रिकेट कारकीर्दीत अनेक चढ-उतार पाहिलेला विराट व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे खूपवेळा चर्चेत राहिला आहे. अनेक मुलींसोबत त्याचे नाव जोडले गेले. त्याच्या कथित गर्लफ्रेंडविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

साक्षी अग्रवाल (Sakshi Agarwal)
तमिळ अभिनेत्री साक्षी अग्रवालसोबत विराट कोहलीचे नाव जोडले गेले आहे. साक्षी हे विराटचे पहिले प्रेम होते, पण हे नाते फार काळ टिकले नाही. लवकरच दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

संजना गलराणी (Sanjjanaa Galrani)
विराटचे नाव अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींसोबत जोडले गेले, त्यापैकी एक म्हणजे संजना गलरानी. कोहली संजनासोबत टेनिस खेळायचा आणि लाँग ड्राईव्हवरही जायचा. या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिले गेले, पण हे नाते देखील फार काळ टिकले नाही.

तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)
बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियासोबतही काही काळ विराट कोहली रिलेशनशिपमध्ये होता. विराट आणि तमन्ना हे दोघे एका जाहिरातीनिमित्त एकत्र आले होते, त्यानंतर दोघांचे नाव वारंवार समोर आले. २०१२ मध्ये ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले होते की ते लग्न करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, पण नंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले आणि दोघांनी आपले मार्ग वेगळे केले.

इझाबेल लिटे (Izabelle Leite)
ब्राझिलियन मॉडेल इझाबेल लिटेचेही नाव विराटसोबत जोडले गेले होते. जून २०१२मध्ये विराट इझाबेलला डेट करत असल्याची बातमी समोर आली होती. विराट इझाबेलसोबत सिंगापूरमध्ये खरेदी करताना दिसला होता. तेव्हा इझाबेलला जास्त कुणी ओळखत नव्हते. २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या आमीर खानच्या तलाशमधून इझाबेलने आपल्या कारकीर्दीची सुरवात केली. दोघे काही महिने एकत्र राहिले आणि नंतर वेगळे झाले. २०१४मध्ये एका मुलाखतीमध्ये इझाबेलने विराटसोबतच्या नात्याबाबत कबुली दिली होती. दोघे २ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण परस्पर संमतीने दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर ते चांगले मित्र झाले आहेत.

सारा जेन डायस (Sarah Jane Dias)
विराट कोहलीसोबत सारा जेनचेही नाव जोडले गेले होते. दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. साराच्या व्यस्त शेड्युलमुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
२०१३मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराटची भेट झाली होती. एका शॅम्पू कंपनीच्या जाहिरातीवेळी ते पहिल्यांदा भेटले होते. तेव्हापासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली होती. २०१७मध्ये त्यांनी लग्न केल आणि या वर्षी जानेवारी महिन्यात अनुष्का आणि विराट हे एका लहान परीचे पालक बनले. विरुष्काने मुलीचं नाव वामिका ठेवले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: