देशातील पहिला ऑक्सिजनचा प्रकल्प उभा केला त्याबद्दल अभिजीत पाटील यांचा सत्कार

देशातील पहिला ऑक्सिजनचा प्रकल्प उभा केला त्याबद्दल अभिजीत पाटील यांचा सत्कार Abhijeet Patil felicitated for setting up first oxygen project in country
  पंढरपूर, प्रतिनिधी - देशात कोरोनासारख्या महामारीचे संकट आहे त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत असल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्माण करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी लगेच आपल्या कारखान्यावर प्रकल्प उभा करण्याचा मानस केला आणि अगदी कमी कालावधीत ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण केला.

  या उदघाटनप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख,खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल उदघाटन करण्यात आले.

ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन होऊन कार्यान्वित झाला त्यामुळे कोरोना काळात आता ऑक्सीजन मुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत. त्या कामाचे कौतुक करण्यासाठी चळे गावचे माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष उमेश मोरे, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष गणेश ननवरे,होळ्याचे योगेश होळकर यांनी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा सत्कार केला.

 यावेळी कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, संदीप खारे, सुरेश सावंत, सजंय खरात, दिपक आदमिले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: