दोन दिवसात सोनं ९५० रुपयांनी महागलं ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव


हायलाइट्स:

  • सलग दोन दिवस झालेल्या तेजीने सोन ९६० रुपयांनी महागले आहे.
  • चांदीमध्ये देखील दोन दिवसात १९७० रुपयांची वाढ झाली आहे.
  • मागील दोन दिवस मुहूर्ताला सराफा बाजारात सोने विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई : लक्ष्मीपुजनानंतर कमॉडिटी बाजारात तेजी ठाण मांडून बसली आहे. काल शुक्रवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. सलग दोन दिवस झालेल्या तेजीने सोन ९६० रुपयांनी महागले आहे. चांदीमध्ये देखील दोन दिवसात १९७० रुपयांची वाढ झाली आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी बाजार बंद होताना सोनं ३९० रुपयांनी महागले. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७९४३ रुपये झाला. एक किलो चांदीचा भाव ६४३३० रुपये झाला. त्यात २१० रुपयांची वाढ झाली. दोन दिवसात सोनं ९६१ रुपयांनी महागले तर चांदी १९६९ रुपयाने महागली.

पॅनकार्डशिवाय खाती उघडली; प्राप्तिकर विभागाने ‘या’ सहकारी बँंकेचे ५३ कोटी गोठवले
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी लक्ष्मी पूजनानंतर सोने आणि चांदीने मोठी उसळी घेतली होती. गुरुवारी सोने ५७१ रुपयांनी महागले आणि ४७६७१ रुपये इतका भाव झाला होता. चांदीमध्ये १७५९ रुपयांची वाढ झाली आणि एक किलो चांदीचा भाव ६२२२४ रुपये झाला होता. मागील दोन दिवस मुहूर्ताला सराफा बाजारात सोने विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

हेल्मेटसह अपघाती विमा संरक्षण; आयसीआयसीआय लोम्बार्डचा वेगा हेल्मेटशी केला करार
Goodreturns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२२० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४७२२० रुपये झाला. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२५० रुपये आणि २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१५५० रुपये आहे. दिल्ली सोने ४४० रुपयांनी महागले. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५४१० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९५४० रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७५०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०२०० रुपये इतका आहे. त्यात शुक्रवारच्या तुलनेत ९५० रुपयांची वाढ झाली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: