कोविड पश्चात काही आजारांची लक्षणं जाणवल्यास तातडीने संपर्क साधा – डॉ.पियुष जक्कल
सामान्य रुग्णालयात कोविड पश्चात उपचारास सुरुवात Treatment of post covid in the general hospital
भंडारा,दि.20 – कोरोना झाल्यानंतर उद्भवणाऱ्या अन्य आजाराबाबत सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत 1400 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत.
कोविड पश्चात काही आजारांची लक्षणं जाणवल्यास तातडीने संपर्क साधा – डॉ.पियुष जक्कल
कोरोना होऊन गेल्यानंतरही अन्य आजारची लागण झाल्याचे रुग्ण सांगतात. कोरोनानंतर थकवा येणे,अशक्तपणा येणे,भोवळ येत असल्याचे जाणवणे असे अनुषांगिक आजार रुग्णांना होत आहेत. या आजारावर सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण क्रमांक 5 मध्ये उपचार केले जात आहेत. हा विभाग सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 4 ते 6 यावेळेत सुरु असतो. या ठिकाणी कोविड पश्चात भौतिक उपचार केले जातात. ज्या नागरिकांना कोविड पश्चात काही आजारांची लक्षणं जाणवल्यास त्यांनी सामान्य रुग्णालय भंडारा येथील बाह्यरुग्ण विभागात सुरु असलेल्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पियुष जक्कल यांनी केले आहे.