मी तुला आधीच वॉर्निंग देतोय; एनसीबी अधिकारी आणि सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप व्हायरल, नवाब मलिकांचे ट्वीट


हायलाइट्स:

  • नवाब मलिकांचे सकाळीच खळबळजनक ट्वीट
  • एनसीबीचे अधिकारी व सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप
  • नवाब मलिकांनी सांगितलं सॅम डिसूझाचे खरं नाव

मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी रविवारी आणखी एक ट्वीट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पत्रकार परिषदेच्या आधी नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅम डिसूझा (sam dsouza) आणि एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही. सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

नवाब मलिक व एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिकांनी अनेर नवीन खुलासे केले आहेत. आजही ते पत्रकार परिषद घेऊन नवीन गौप्यस्फोट करणार आहेत. त्यानंतर आज पत्रकार परिषदेच्या आधी नवाब मलिकांनी एक ट्वीट केलं आहे.

वाचाः रोहित पवारांच्या ‘त्या’ विधानावरुन जयंत पाटलांनी टोचले कान; म्हणाले…पत्रकार परिषदेआधी सॅनविल स्टॅनले डिसूझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही. सिंह यांच्या संवादाची एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. यामध्ये सॅनविलने व्ही व्ही सिंह यांच्याकडे घरी नोटिस पाठवल्याबाबत विचारणा केली आहे. यावेळी सॅनविलने तब्येत बरी नसल्याने मी सोमवारी एनसीबी कार्यालयात येऊ का? अशी विचारणा केली. त्यावर सिंह यांनी सोमवारी नको मग तू बुधवारी ये असे म्हटलं. तसंच, तुझा मोबाईल घेऊन ये. माझ्याकडे तुझा आयएमआय नंबर आहे. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय, असं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे.

तसंच, नवाब मलिक यांनी ट्विटरवर सॅम डिसूझाचा फोटो शेअर करताना म्हटलं की, ही व्यक्ती सॅम डिसूझा नाही. त्याचं खरं नाव सॅनविले स्टेनली डिसूझा असं आहे. त्याच्या खऱ्या नावाने एनसीबीने ड्रग्ज केस प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

वाचाः अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी पोलिसांनी उचलले मोठे पाऊलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *