T20 World Cup: अफगाणिस्तानने दिली भारताला आनंदाची बातमी, न्यूझीलंडविरुद्ध जिंकला…
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील लढत सुरू होताच एक आनंदाची बातमी भारताला मिळाली आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये नाणेफेकीचा कौल अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकल्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे २०१६ पासून त्यांनी टी-२० वर्ल्डकपमध्ये टॉस १३ वेळा टॉस जिंकला आहे आणि त्या १३ ही सामन्यात त्यांनी विजय मिळवलाय.
वाचा- आज अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडचा पराभव झाला…; शोएब अख्तर म्हणायचे तरी काय
अफगाणिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत २०१६ पासून टी-२० वर्ल्सकपमध्ये १९ सामने दिवसाचे खेळले आहेत. यापैकी १८ लढतीत त्यांचा विजय झालाय. तर ज्या एक लढतीत त्यांचा पराभव झाला होता ती त्यांनी सुपर ओव्हरमध्ये गमावली होती. भारतासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागले. करण अफगाणिस्तानचा याआधीचा विक्रम पाहिला तर त्यांनी टॉस जिंकल्यानंतर नेहमी विजय मिळवला आहे. आज देखील तसेच झाले तर भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी मिळेल.
वाचा- ख्रिस गेल क्रिकेटला करणार अलविदा; ‘या’ मैदानातून घेणार संन्यास