india china news : ‘विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी चीनला दाखवा’, काँग्रेसचा निशाणा


नवी दिल्लीः भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत झाली. पंतप्रधान मोदी, अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. एकीकडे भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चीनसंबंधी आपले धोरण देशासमोर मांडावं, असं काँग्रेसने म्हटलं. चीनला दिलेली क्लीन चिट पंतप्रधान मोदी आज मागे घेतील आणि काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा वक्त करत काँग्रेसने टोला लगावला.

चीनने अरुणाचल प्रदेशात भारताच्या सीमेच्या आत साडेचार किमी आतमध्ये एक गाव वसवले आहे, अमेरिकेच्या पेंटागॉनने हा रिपोर्ट दिला आहे. चिनी सैन्य सीमा भागात रस्त्यांचं जाळं विणत आहे. तसंच वास्तू आणि ऑप्टिकल फायबर केबलचे नेटवर्क उभारत आहे. यामुळे चीनला दिलेली क्लीन चिट पंतप्रधान मोदी मागे घेतील आणि चीनवर बोलतील, असं काँग्रेस म्हणाली.

या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे. कारण सामरिक आणि दृष्ट्या हा भाग महत्त्वाचा आहे. चीनच्या या कुरापतींमुळे सिलिगडुी कोरिडोर धोक्यात आला आहे. गेल्या १८ महिन्यात चीनने वेगवगेळ्या प्रकारे घुसखोरी केली आहे. गेल्या महिन्यात चीनने पूल तोडला होता, असं काँग्रेस म्हणाली.

pm modi : ‘भाजप घराणेशाहीवर आधरित पक्ष नाही…’, PM मोदी काँग्रेसवर बरसले

चीनच्या सततच्या कुरापतींवर भारत गप्प आहे. चीन भूतानशी चर्चा करतोय आणि भारत सरकार गप्प आहे. चीन श्रीलंकेत बंदर काबिज करतो आणि मालदीवमध्ये द्वीप घेतो, तरीही भारत सरकार गप्प आहे. चीन ग्वादर बंदल बळकावतो, तरीही भारत गप्पा आहे. इतकं सगळं होऊनही भारत सरकार मूग गिळून गप्प का आहे? चीनला दिलेली क्लीन चिट भारत मागे का घेत नाहीए? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. चीन दिलेल्या क्लीन चिटने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. चीनसोबतचा व्यापार ६७ टक्क्यांनी वाढला आहे. देशाच्या शत्रूला लाल डोळे दाखवण्याऐवजी विरोधी आणि पत्रकारांना दाखवले जात आहे, असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला.

pm modi tops in global leader approval : PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, मिळाली ७० टक्के पसंतीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: