यंदा कार्तिकी यात्रा भरणार जिल्हाधिकारी यांनी कार्तिकी यात्रेसाठी दिली परवानगी

यंदा कार्तिकी यात्रा भरणार जिल्हाधिकारी यांनी कार्तिकी यात्रेसाठी दिली परवानगी
  पंढरपूर /नागेश आदापुरे : पंढरपूर कोरोना महामारीच्या काळामध्ये तब्बल 20 महिने पंढरपुरामध्ये यात्रा भरवण्यात निर्बंध होते पण आता कोरनाचा संसर्ग कमी होत असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे सारे व्यवहार हळूहळू सुरळीत होत असताना शासनाने वारकऱ्यांची मागणी पूर्ण करत यंदाची कार्तिकी यात्रा भरवण्यास मान्यता दिली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषय सर्व नियमांचे पालन करत यात्रा भरण्यास मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर आदेश पारीत केला असून पंढरपूर प्रांताधिकारी यांना सादर केलेल्या प्रस्तावात परवानगी दिलेली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनेही कार्तिकी यात्रा भरण्यास मान्यता देण्याची मागणी केली होती.कोरोना प्रतिबंधक धोरणामुळे मार्च 2020 पासून पंढरपुरामध्ये एक ही यात्रा भरलेली नव्हती आता 7 नोव्हेंबर पासून सुरु होत असलेल्या कार्तिकी यात्रेस परवानगी मिळालेली आहे,त्यामुळे वारकरी संप्रदाय व पंढरपूरमधील व्यापारी,टांगेवाले, रिक्षावाले,मठवाले,लॉजिंगवाले यांच्यामध्ये आनंद उत्साह निर्माण झाला आहे कारण पंढरपुरातील यात्रा बंद असल्यामुळे पंढरपूरचे पूर्ण अर्थकारण ठप्प झाले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिरात भाविकांचे दर्शन,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणारी एकादशीची शासकीय महापूजा,एकादशीचा रथ उत्सव ,नैवेद्य, श्री विठ्ठलाच्या पादुका मिरवणूक, महाद्वार काला ,पंढरपुरात येणाऱ्या मठामध्ये उतरण्याचे भाविकांची नियमावली, वाळवंटातील परंपरा,आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा सर्वबाबत सविस्तर उपाययोजना करण्याचे आदेश व सूचना देण्यात आले आहेत.कोविंड 19 विषाणूचे प्रतीकात्मक उपाययोजना ,शासनाचे निर्णय मार्गदर्शन सूचना आधीन राहून सर्व यात्रा सुरळीतपणे पार पाडण्याचे आदेश जिल्हा अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: