पाकिस्तानची दादागिरी! भारतीय नौकेवर गोळीबार; पालघरमधील मच्छीमाराचा मृत्यू


हायलाइट्स:

  • गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी नौदलाची दादागिरी
  • भारतीय मासेमार नौकेवर केला बेछूट गोळीबार
  • गोळीबारात पालघरच्या मासेमाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पालघर: गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील सागरी सीमेवर मासेमारी करणाऱ्या भारतीय नौकेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील एका माच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. तर, गुजरातमधील एका मच्छीमाराला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळं मच्छीमारांमध्ये चिंतेचं व संतापाचं वातावरण आहे. (Palghar Fisherman Dead in Pakistani Firing at Okha Coast)

गुजरात राज्याच्या ओखा बंदरातील ‘जलपरी’ ही नौका शनिवारी मासेमारी करण्यास समुद्रात गेली होती. ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा इथं मासेमारी करत असताना पाकिस्तानी सागरी सुरक्षा रक्षकांनी पहाटेच्या सुमारास भारतीय हद्दीत शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार केला. त्यात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील तरुण मच्छिमार श्रीधर रमेश चामरे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं मच्छीमारांमध्ये संताप आहे.

वाचा: शिवसेनेच्या मंत्र्याविरोधात नीलेश राणेंचं शिवराळ ट्वीट; वातावरण तापलं!

महाराष्ट्र व गुजरात सरकारनं तातडीनं पावलं उचलून केंद्र सरकारच्या मदतीनं श्रीधर रमेश चामरे यांचा मृतदेह सन्मानपूर्वक आणावा व पाकिस्तानी सैनिकांच्या अमानवी कृत्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी केली जावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. या प्रकरणी ओखा येथील मरीन पोलिस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर घटनेची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौकेचे मालक जयन्ताभाई बोखामा यांनी दिली.

पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेण्याच्या व त्यांच्या बोटी जप्त करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मार्च महिन्यातही पाकिस्ताननं काही मच्छीमारांना अटक केली होती. हे प्रकार थांबवण्यासाठी भारत सरकारनं प्रयत्न करावेत, अशीही मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.

वाचा: ‘शाहरुख खानला आजही धमकावलं जातंय; त्याला सांगितलं जातंय की…’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: