Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये ४ CRPF जवान ठार; जवानानेच केला घात


हायलाइट्स:

  • केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शिबिरात गोळीबार
  • सुकमा जिल्ह्यातील लिंगमपल्ली गावातील घटना
  • गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट

सुकमा, छत्तीसगड : छत्तीसगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. सुकमा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शिबिरात झालेल्या गोळीबारात चार जवान ठार झाले आहेत तर तीन जवान गंभीर जखमी आहेत. सीआरपीएफ कॅम्पमध्ये तैनात भारतीय जवानानं आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला. पोलिसांनी ही माहिती दिलीय.

राज्यातील बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील लिंगमपल्ली गावात स्थित सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या शिबिरात ही घटना घडलीय. जवानानं आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात चार जवानांना आपले प्राण गमवावे लागलेत तर तीन जण जखमी आहेत.

india china news : ‘विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी चीनला दाखवा’, काँग्रेसचा निशाणा
Ayodhya: अयोध्या ‘दीपोत्सवा’नंतर विझलेल्या पणत्यांतून उरलेलं तेल गोळा करायला झुंबड!
आरोपी जवानानं हा गोळीबार का केला? यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

या घटनेची माहिती मिळताच इतर जवान आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि घायाळ झालेल्या जवानांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

pm modi tops in global leader approval : PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, मिळाली ७० टक्के पसंती
Ahmednagar Fire: अहमदनगर रुग्णालय आगीत १० जण होरपळले; राष्ट्रपती-पंतप्रधानही हळहळले!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: