हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून या सामाजिक कार्याला अभिवादन सोलापूर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.निशिगंधा माळी
मायेची उब अनं मदतीचा आधार प्रेरणादायी : डॉ. निशिगंधा माळी
पंढरपूर /प्रतिनिधी – आभाळाचं पांघरून आणि जमिनीचं आंथरूण अशा परिस्थितीतही मोठय़ा जिद्दीने जीवनाला सामोरे जाणार्या अनाथ मुलांना मायेची उब आणि मदतीचा आधार देण्याचे सामाजिक कर्तव्य रोपळे येथील 1994-95 मधील दहावीच्या बॅचमधील मित्रांनी एकत्रित येवून पार पाडले आहे. हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून या बॅचमधील मित्रांच्या या सामाजिक कार्याला अभिवादन आहे,असे प्रतिपादन सोलापूर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ .निशिगंधा माळी यांनी केले.
मोहोळ येथील भारतमाता आदिवासी आश्रम शाळेतील अनाथ मुलांना 1994- 95 दहावीच्या बॅचमधील मित्रांनी मनापासून मनापर्यंत हि संकल्पना पुर्णत्वास आणून थंडीपासून बचाव व्हावा म्हणून चादरी,ब्लँकेट , आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे औषधे,टॉवेल आदी वस्तू दिल्या.या मुलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून फराळ देण्यात आला. यावेळी डॉ .माळी बोलत होत्या.
डॉ.पंडीत माळी, पत्रकार महेश सोहनी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी अश्विनी फाळके, रेश्मा माळी, संजिवनी वेदपाठक, संध्या खिस्ते, रेखा मगर, दादा रोकडे, दत्ताभाऊ भोसले, दादासाहेब लोखंडे, दशरथ कदम, संभाजी गोडसे, संजय खपाले, गणेश अढवळकर, आनंद पाटील, माजी सरपंच गणेश पाटील, श्रीकृष्ण दाढे, सलीम पठाण, हनुमंत खामकर, अजय सरडे, सुजीत कांबळे आदी उपस्थित होते.
मित्रांमुळे सामाजिक भुमिकेला आकार
समाजातील गरजूना त्यांच्या जगण्यातला आनंद मिळावा म्हणून काहीतरी केले पाहिजे अशी खुप दिवसांपासूनची तळमळ होती. त्यासाठी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाहि नोंदविला आहे. परंतु आज खर्या अर्थाने मित्रांमुळे आपल्या सामाजिक भुमिकेला न्याय मिळाला असून याचा अभिमान असून सर्व मित्रांचे कौतुक आहे.यापुढेही अशाप्रकारेच गरजवंताना मदत करीत राहू – अश्विनी फाळके(भोसले)