अर्थ कारणातून सहकारी संस्था बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना खडयासारखे बाजुला सारा – कल्याणराव काळे

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.03 – अर्थ कारणातून सहकारी संस्था बळकावत सहकाराचा हेतू धुळीस मिरविणाऱ्यास जनता खडयासारखी बाजुला करेल असा विश्वास कल्याणराव काळे यांनी आज गादेगांव, सोनके, तिसंगी, कोर्टी आदी गावामध्ये सभासदांचे विचार विनिमय बैठकी दरम्यान व्यक्त केला.

सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात शनिवारी गादेगांव, सोनके, तिसंगी, कोर्टी येथील सभासदांची थेट विचार विनिमय घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कल्याणराव काळे बोलत होते.सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे सभासद हे स्वाभिमानी आहेत.सुज्ञ सभासद सहकार शिरोमणी परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील. माझा सभासदांवर पुर्ण विश्वास आहे. कारखाना चालवित असताना विविध प्रकारच्या कर्ज देणाऱ्या बँकाकडून कर्ज मिळण्यास वेळ लागला यावेळी विरोधकांकडून कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडचणी निर्माण केल्या जात होत्या. सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या खोटया कर्जाची आकडेवारी जाहीर करुन सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करुन अपप्रचार करीत आहेत.विरोधक हे कर्ज झालेले कारखाने कमी पैशामध्ये विकत घेवून चालवून दाखविण्याचा देखावा करीत आहेत. नांदेड येथील साखर कारखाना चालविण्यास घेतला होता परंतू तो कारखाना त्यांच्या नाकर्तेपणामुळे तो विकुन टाकला आहे.विरोधकांपासून सभासदांनी वेळेत सावध होण्याची ही निवडणुक असल्याचे कल्याणराव काळे म्हणाले .

यावेळी भारत कोळेकर, सुधाकर कवडे, नागेश फाटे, दत्तात्रय खरात, पोपट बागल, विठ्ठल बागल, प्रदीप बागल, महादेव देठे, नवनाथ बागल, जालींदर गोफणे,दादा खरात,भारत पडळकर, भागवत महारनवर, तानाजी गोफणे, दत्तात्रय बंडगर, समाधान पाटील, शिवाजी कोळेकर, शिवाजी गोफणे यांचे सह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

सोनके येथील अमोल खरात याने चेअरमन कल्याणराव काळे यांचे उपस्थित काळे गटात प्रवेश केला .यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.