LK Advani birthday: मोदी-शहांनी असा साजरा केला लालकृष्ण अडवाणींचा वाढदिवस!


हायलाइट्स:

  • लालकृष्ण अडवाणींच्या वाढदिवसाचा छोटेखानी समारंभ
  • मोदी, शहा, नड्डांची उपस्थिती
  • कुटुंबीय आणि भाजप नेत्यांसोबत अडवाणींनी कापला केक

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज ९४ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवासानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भाजप नेत्यांची रीघ लागलीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा सोमवारी सकाळीच ज्येष्ठ नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच पुष्पगुच्छ घेऊन अडवाणींची भेट घेण्यासाठी दाखल झाले. अडवाणींचा हात आपल्या हातात घेऊन पंतप्रधान मोदी त्यांना घरातून लॉनपर्यंत घेऊन आलं. यावेळी, ९४ वर्षीय नेत्याचा एक हात मोदींच्या हातात होता तर दुसऱ्या बाजुने त्यांची मुलगी प्रतिभा यांनी आपल्या पित्याचा हात हातात घेतला होता.

pm modi : ‘भाजप घराणेशाहीवर आधारित पक्ष नाही…’, PM मोदी काँग्रेसवर बरसले
शेतकरी आंदोलन: सत्यपाल मलिकांच्या भाषणात इंदिरा गांधींच्या हत्येचा उल्लेख

दोघांच्या साथीनं लालकृष्ण अडवाणी लॉनपर्यंत आले आणि इथं ठेवलेल्या खुर्चीत बसले. इथे त्यांच्यासाठी केकही आणण्यात आला होता. गोल टेबलाच्या बाजुने खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या खुर्च्यांवर नरेंद्र मोदी, नायडू, शहा, राजनाथ सिंह आणि नड्डा स्थानापन्न झाले. सर्वांच्या उपस्थितीत केक कापून इथे अडवाणीच्या वाढदिवसाचा छोटेखानी समारंभ पार पडला.

पंतप्रधान मोदी दरवर्षी अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी दाखल होताना दिसून आले आहेत. सोशल मीडियावरही लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अडवाणींनी गुजरातच्या गांधनगर लोकसभा मतदारसंघातून अनेकदा निवडणूक लढवली. याच मतदारसंघातून सध्या गृहमंत्री अमित शहा लोकसभा सदस्य आहेत.

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये ४ CRPF जवान ठार; जवानानेच केला घात
india china news : ‘विरोधकांना लाल डोळे दाखवण्याऐवजी चीनला दाखवा’, काँग्रेसचा निशाणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: