जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाचे धक्कातंत्र; उमेदवारांनी घेतला ‘हा’ निर्णय


हायलाइट्स:

  • जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाचे धक्कातंत्र.
  • निवडणुकीवर बहिष्कार टाकत उमेदवारांनी घेतली माघार.
  • शेतकऱ्यांची बँक असतांना शेतकरी हीत जोपासले जात नाही- गिरीश महाजन.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज माघारीच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्यात. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेतील अधिकऱ्यांवर दबाव येत असल्याचा आरोप करीत निवडणुकीवर बहिष्कार घालत गिरीश महाजन यांच्यासह सर्व उमेदवारांनी माघार घेतली. शेतकऱ्यांची बँक असतांना शेतकरी हीत जोपासले जात नसल्यानेच निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. तसेच आता जिल्हा बँकेत सुरु असलेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी भाजपाकडून पाठपुरावा करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. भाजपाच्या बहिष्कारामुळे जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व निश्चित झाले आहे. (BJP used shock tactics in Jalgaon District Central Co-operative Bank elections)

यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते. आताच्या निवडणुकीसाठी असेच प्रयत्नांमध्ये सर्व पक्षांसोबत होतो. जागा वाटपापर्यंत चर्चा झाली होती. मात्र ऐनवेळी अन्य पक्षांनी विश्वासघात केला. मात्र आम्हाला गाफील ठेऊन बाकिच्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्या. दोन महिने बैठका सगळे ठरलेले असताना शेवटच्या दिवशी भाजपाचा विश्वासघात करीत यु टर्न घेतला. सर्वपक्षीयचे ठरले असल्याने भाजपाने केवळ सातच उमेदवारांची तयारी केली असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगीतले.

क्लिक करा आणि वाचा- शरद पवार यांनी पुरवला नातू आमदार रोहित पवार यांचा ‘हा’ हट्ट

त्यानतंर देखील महविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुक प्रक्रीयेतील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत भाजपच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद केले. त्यानतंर नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे भाजपाच्या उमेदवारांनी केलेले अपिल देखील याच दबावातून फेटाळण्यात आल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. या सर्व प्रकराचा निषेध म्हणून भाजपाच्या सर्व उमेदवारांनी माघार घेवून निवडणूकीवर बहिष्कार टाकल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी महाजन यांच्यासोबत यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवलं की नाही?; दिल्ली एनसीबीने दिली ‘ही’ माहिती

आता बँकेतील गैरव्यवहार उघडकीस आणणार

जळगाव जिल्हा बँकेत गेल्या पाच वर्षात अनेक चुकीची कामे झालीत. जिल्हा बँकेत ज्यांची सत्ता आहे त्यांचेच सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शैक्षणिक संस्था, उद्योग आहेत. त्यांनीच जिल्हा बँकेकडून आपल्या या संस्थांसाठी कर्ज मिळवून घेतले आहे. बँक शेतकऱ्यांसाठी आहे की पदाधिकारींसाठी हेच समजत नाही. बँकेत शेतकरी हीत जोपासले जात नाही. त्यामुळे आता भाजपाकडून या सर्व प्रकाराचा पाठपुरावा करून दूध का दूध और पाणी का पाणी करून बँकेतील गैरव्यवहार समोर आणणार असल्याचा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला.

क्लिक करा आणि वाचा- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’; सोमय्यांचा गंभीर आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: