kashmir : दहशतवाद्यांनी केली सेल्समनची हत्या, २४ तासांतील दुसरा हल्ला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी या हत्येचा निषेध केला आहे. इब्राहिमची निर्घृण हत्या झाली आहे. या हत्येचा निषेध करतो. दुर्दैवाने इब्राहिमची हत्या केली गेली, असं उमर अब्दुल्ला म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून दहशतवादी सामान्यांना हल्ल्याचे लक्ष्य करत आहेत. रविवारी बटमालू भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या केली होती. रविवारी रात्री जवळपास ८ वाजता पोलीस कॉन्स्टेबर तौसीफ अहमद यांच्यावर त्यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
दहशतवाद्यांशी चकमकीत ऑक्टोबरमध्ये १२ जवान काश्मीरमध्ये शहीद झाले होते. दहशतवाद्यांनी १३ नागरिकांची हत्या केली. यात व्यापारी, मजूर आणि शिक्षकांचा समावेश आहे. दुसरीकडे सुरक्षा दलांनी २० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.