दोंडाईचा येथे संविधान पथ आणि जयभीम सामाजिक सभागृहाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण

दोंडाईचा येथे संविधान पथ आणि जयभीम सामाजिक सभागृहाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई,दि 8/11/2021 : माजीमंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून दोंडाईचा, जिल्हा धुळे येथे संविधान पथ आणि जयभीम सामजिक सभागृह, माता रमाई आंबेडकर यांचे शिल्प आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, संविधान उद्यान या विकासकामांचे लोकार्पण रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले .

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विविध विकासकामे आमदार जयकुमार रावल यांनी केली आहेत.संविधान पथ निर्मिती ची संकल्पना राबविल्याबद्दल आमदार जयकुमार रावल यांचे कौतुक ना.रामदास आठवले यांनी केले.

     यावेळी दोंडाईचा वरवडे नगरपरिषदेच्या  नगराध्यक्षा आणि जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरजी रावल ,उद्योगपती सरकारसाहेब जे जे रावल, माजी आमदार सुधाकर भालेराव , जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे,शेख नबू पिंजारी, रमेश मकासरे,शशिकांत वाघ,मुख्य अधिकारी डॉ. प्रवीण निकम,सुनील बैसाने,महिंद्रा निळे ,प्रभाकर जाधव, महावीरसिंग रावल,चिरंजीवी चौधरी,राजू शिरसाट,आबा खंडारे,धनंजय मंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: