T 20 World Cup 2021 : सामना सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीने केली मोठी चुक, पाहा नेमकं काय केलं…


दुबई : भारताचा आजचा विश्वचषकातील हा अखेरचा सामना आहे, त्याचबरोबर विराट कोहलीचाही कर्णधार म्हणून अखेरची लढत खेळत आहे. पण हा सामना सुरु करण्यापूर्वी विराट कोहलीने मोठ चुक केल्याचे पाहायला मिळाले आहे.

विराट कोहलीने सामना सुरु होण्यापूर्वी कोणती मोठी चुक केली, पाहा…
विराट कोहली आज शेवटचा टॉस करण्यासाठी मैदानात आला. यावेळी विराटकडून एक मोठी चुक घडली. विराटने नाणेफेक जिंकच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आपल्या नेतृत्वाबाबत त्याने चार शब्द सांगितले. तिथपर्यंत सारं काही आलबेल होतं. पण त्यानंचर विराट जे काही म्हणाला तिथेच समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. विराट यावेळी म्हणाला की, ” आता कर्णधार म्हणून बाजूला सरण्याची वेळ आली आहे. आता वेळ आहे ती कर्णधारपदाच्या पुढील वारसदाराची. रोहित शर्मा हा इथे आहेच आणि तो काही वेळातच भारताच्या कर्णधारपदाची सूत्रे हातामध्ये घेईल.” इथेच कोहलीने मोठी चुक केल्याचे पाहायला मिळाले.

आपण यापुढे भारताचे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवणार नाही, हे सांगणे उचित होते. पण आपल्यानंतर भारताचे कर्णधारपद कोण सांगणार, हे सांगत कोहलीने मोठी चुक केली आहे. खरंतर ही गोष्ट निवड समिती किंवा बीसीसीआयने जाहीर करायची असते. पण विराटने यावेळीही घाई केल्याचे पाहायला मिळाले. कारण एखाद्या सामन्यापूर्वी टॉसच्यावेळी अशी गोष्ट सर्वांसमोर सांगणे हे कोणत्याही कर्णधाराला शेभत नाही. कारण आपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार, हे जाहीर करण्याचा अधिकार निवड समितीला आहे किंवा बीसीसीआय याबाबत माहिती देऊ शकते. कारण याबाबत एक निवड प्रक्रीया असते. निवड समिती प्रशिक्षकांच्या मदतीने एक बैठक घेते. यामध्ये संघाच्या भविष्याचा विचार केला जातो आणि त्यानंतर संघाचे कर्णधारपद कोणाला द्यायला हवे, याचा निर्णय घेण्यात येतो. पण ही प्रक्रीया सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीने रोहित शर्मा भारताचा पुढच कर्णधार होणार असल्याचे सांगत सामना सुरु होण्यापूर्वीच मोठी चुक केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: