मौजे बोंढार ता.जि.नांदेड येथे भिम जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या….ॲड. किर्तीपाल सर्वगोड
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – नांदेड जिल्ह्यामध्ये दि 01 जून 2023 रोजी मौजे बोंढार ता.जि. नांदेड येथे डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक शहीद अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पंढरपूर यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सदरची घटना फुले, शाहू, डॉ.आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. म्हणून याबाबत मागण्यांचे निवेदन सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांना देण्यात आले.
डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक शहीद अक्षय भालेराव यांचा निर्घृण खून करण्यात आला. मयत अक्षय भालेराव यांच्यावर झालेल्या जातीय अत्याचारातून खून झालेली फिर्याद त्यांनी नांदेड ता.जि. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने दि. 02 जून 2023, गु.र.नं. 392/2023 नुसार व अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 सुधारित अधिनियम 2015कलम 3(1)r, 3(1)s ,3(2)va. ,IPC 143, 147, 148, 149, 302,307,324,323, 294, 504,506,34 व शस्त्र अधिनियम 1959 कलम 4,25,27 नुसार गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेड ग्रामीण हे तपास करीत आहेत.
सदर खटल्यात ॲट्रोसिटीचे खटले हाताळण्याचा अनुभव असणाऱ्या वरिष्ठ विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करण्यात यावी. सदर खून खटल्यातील पीडितांना शासकीय नियमानुसार आर्थिक अनुदान मंजूर करण्यात यावे व या मदती व्यतिरिक्त मा.तहसीलदार यांनी अधिक आर्थिक साहाय्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन दिल्ली यांना प्रस्ताव पाठवण्यात यावा.गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण) नांदेड परिक्षेत्र ,यांनी दिलेल्या लेखी सूचना दोषारोप पत्रात समाविष्ट कराव्यात.फिर्यादी व साक्षीदार यांच्याबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रत्येकास खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे.हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे व गुन्ह्याचा परिणाम समाजमाध्यमांवर पडला असून जनतेचा कायद्यावरील विश्वास वाढवण्यासाठी आरोपीस जामीन मिळू नये म्हणून तपासी अधिकारी यांनी स्वतः विशेष न्यायालयात फिर्यादीची बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहावे.
गुन्ह्यातील तपासाची प्रगती पाहण्यासाठी नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस पथकाने घटनास्थळी दुबार भेट देऊन तपासी अधिकारी यांच्याकडून अहवाल घ्यावा. सर्व कायदेशीर मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर शहर यांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर शहर अध्यक्ष ॲड.किर्तीपाल सर्वगोड यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे सहा.पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव व पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्याकडे देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्ह्याचे नेते अरविंद कांबळे, प्रवीण माने, दिपक चंदनशिवे, युवक नेते अमित कसबे, युवक शहराध्यक्ष विशाल मांदळे, संघटन सचिव संदेश माने, कोषाध्यक्ष सचिन भोरकडे, प्रशांत सर्वगोड, अक्षय आठवले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.