कुर्डुवाडीत औषध विक्रेते कोरोना लसीपासून वंचित

कुर्डुवाडीत औषध विक्रेते कोरोना लसीपासून वंचित drug dealer in Kurduwadi deprived of Corona vaccine
 कुर्डुवाडी / राहुल धोका - कुर्डुवाडी शहरातील  केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील औषध विक्रेते आणि त्यांचे कर्मचारी यांना लस देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे .औषध विक्रेते हे रुग्णांसाठी २४ तास सेवा देत असून त्यांचा संपर्क हा प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष कोविड रुग्णाशी येतो.आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात १० औषध विक्रेत्यांचा कोरोना काळात  बळी गेला आहे तरी ही राज्य व केंद्र सरकारने औषध विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केले असून याबाबत तत्काळ औषध विक्रेते व कर्मचार्‍यांचे लसीकरण करावे असे निवेदन प्रांत अधिकारी ज्योती कदम, तालुका आरोग्य आधिकारी डाॅ शिवाजी थोरात, नगराध्यक्ष समीर मुलाणी यांना देण्यात आले  आहे.   

यावेळी अध्यक्ष परेश कोठारी,जयदिप बहिरशेठ, मिलिंद कराडे,हर्षवर्धन दोशी,शरद लोंढे, दिपक दोशी,प्रमोद सुर्वे,विवेक कुलकर्णी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: