केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकणचा पाहणी दौरा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकणचा पाहणी दौरा Union Minister of State Ramdas Athawale’s inspection tour of Konkan
मुंबई – तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील नुकसानग्रस्त झालेल्या रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील गावांची पाहणी करण्याचा दोन दिवसीय दौऱ्याचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रायगडच्या पेण आणि माणगाव येथे भेट देऊन प्रारंभ केला.महाडचा पाहणी दौरा करून रत्नागिरीला रवाना झाले होते.
तसेच सिंधुदुर्ग कुडाळ तालुक्यातील झाराप गावातील सुभद्रा कुडाळकर यांच्या घराची पडझड झाली तिथे भेट दिली. कणकवली,पेंडुरगाव, ओरोस, कुडाळ तालुक्यांतील नुकसानग्रस्त गावांनाही भेटी दिल्या.
त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये,नुकसान भरपाई ताबडतोब,शेतीचे, आंबे, फणस बागांचे झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य शासनाकडे केली आहे.केंद्र सरकारची ही मदत कोकणवासीयांना मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
तोत्के चक्रीवादळातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, नुकसान भरपाई ताबडतोब, शेतीचे, आंबे ,फणस यांचे झालेले नुकसान भरून द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले