Eng vs Nz : इंग्लंडविरुद्ध पराभवाचा वचपा काढण्यासाठी न्यूझीलंड सज्ज, पहिल्या उपांत्य फेरीचा थरार रंगणार


आबुधाबी : काही दिवसांपूर्वी २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंड आण न्यूझीलंड समोरासमोर आले होते. त्यावेळी इंग्लंडच्या संघाने विजय मिळवत विश्वचषक पटकावला होता. त्यामुळे आता या पराभवाचा वचपा घेण्यासाठी न्यूझीलंडचा संघ आतूर असेल.
न्यूझीलंडच्या संघाची या विश्वचषकातील सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला पाकिस्तानकडून पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने भारताला पराभूत केले आणि ते विजयाच्या मार्गावर परतले. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने स्कॉटलंड, नामिबिया आणि अफगाणिस्तान या संघांना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. आता इंग्लंडच्या संघाला धक्का द्यायला न्यूझीलंडचा संघ सज्ज झाला असेल. न्यूझीलंडचे ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, इश सोधी आणि मिचेल सँटवर हे चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचे स्वप्न न्यूझीलंड पाहू शकतो.

इंग्लंडच्या संघाने या विश्वचषकात धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडने एकामागून एक विजय मिळवत विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. पण अखेरच्या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पारभव पत्करावा लागला. त्याचबरोबर या सामन्यात इंग्लंडचा सालामीवीर जेसन रॉयला धाव घेताना गंभीर जखमी झाला होता. रॉय आता विश्वचषकात खेळणार नसल्यामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. रॉयच्या जागी संघात जॉनी बेअरस्टोचा समावेश होऊ शकतो. इंग्लंडच्या गोलंदाजीमध्ये यावेळी विविधता पाहायला मिळत आहे. ख्रिस वोक्स, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद आणि मोइन अली यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल. इंग्लंडसाठी चिंतेची बाब म्हणजे अजून त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांना सूर गवसलेला नाही.

दोन्ही संघांचा विचार केला तर दोघांचेही पारडे सारखेच दिसत आहे. पण गेल्या काही सामन्यांचा विचार केला तर न्यूझीलंडने सलग चार विजय मिळवले आहेत, तर अखेरच्या सामन्यात इंग्लंडला पराभव पत्करावा लागला आहे. हा फरक फक्त दोन्ही संघांमध्ये असेल. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या संघाने जर पराभवाचा वचपा काढण्याचे ठरवले, तर नक्कीच ते हा सामना जिंकू शकतात. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. विश्वचषकाची अंतिम फेरी १४ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: