सांगली जिल्हा बँक निवडणूक : संजयकाका पाटलांच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का


हायलाइट्स:

  • बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात जिल्ह्यातील नेत्यांना अपयश
  • महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार
  • संजयकाका पाटील यांच्या निर्णयाने अनेकांना धक्का

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात जिल्ह्यातील नेत्यांना अपयश आल्यानंतर अखेर महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल आणि भाजपचे शेतकरी पॅनेल यांच्यात सामना रंगत आहे. महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेलचे २१, तर भाजपच्या वतीने शेतकरी विकास पॅनेलचे १६ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

विकास संस्थांमधून महाविकास आघाडीचे शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी), खानापूरमधून आमदार अनिल बाबर (शिवसेना) तर पलूस सोसायटी गटातून महेंद्र लाड (काँग्रेस) हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत.

Sameer Wankhe: वानखेडेंच्या आत्याची पोलिसांकडे तक्रार; मलिक यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

दरम्यान, जिल्हा बँकेत दबदबा असलेले खासदार संजयकाका पाटील यांनी अनपेक्षितपणे माघार घेत धक्का दिला. जिल्हा बँकेच्या १८ जागांसाठी २१ नोव्हेंबरला मतदान होत आहे. निवडणुकीसाठी विद्यमान संचालकांसह खासदार, आमदारासह माजी मंत्री, माजी आमदार अशा दिग्गजांनी अर्ज दाखल केले होते. बँकेच्या इतिहासात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्जांच्या माघारीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना नेत्यांकडून बिनविरोधसाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. अखेर भाजपने त्यांचे शेतकरी विकास पॅनेल, तर महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेल जाहीर केले. सोसायटी गटात दहापैकी केवळ सहा जागांवर भाजपला उमेदवार मिळाल्याने त्यांनी १६ जागांवर पॅनेल जाहीर केले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ७, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या. त्यानुसार महाविकास आघाडीने तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. भाजपकडे मात्र तेवढे सक्षम उमेदवार नाहीत. त्यामुळे अवघ्या चार जागांसाठी चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: