मोटार विमा मिळणार झटपट; लिबर्टी जनरल इन्शुरन्सची ‘फोन पे’सह भागीदारी


हायलाइट्स:

  • डिजिटल पिढीसाठी चारचाकी आणि दुचाकी विमा उपाय
  • लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड, भारतातील आघाडीच्या सामान्य विमा कंपन्यांपैकी एक
  • ‘फोन पे’ चे ३२ कोटी हून अधिक वापरकर्ते

मुंबई :लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड, भारतातील आघाडीच्या सामान्य विमा कंपन्यांपैकी एक असलेली विमा कपंनी, डिजिटल पद्धतीने मोटार विमा ऑफर करण्यासाठी ‘फोन पे‘ सोबतची आपली भागीदारी मजबूत केली.

मालमत्ता की म्युच्युअल फंड? कुठे गुंतवणूक करणे ठरेल फायदेशीर
‘फोन पे’द्वारे, लिबर्टी जनरल इन्शुरन्सची मोटार विमा पॉलिसी मोटर विमा संरक्षणासाठी, विशेषत: डिजिटली जाणकार पिढीसाठी, सुलभता प्रदान करते. २०२० मध्ये, ‘फोन पे’ने विम्याच्या वितरणात पुढाकार घेतला आणि ५ महिन्यांत ५ लाखांहून अधिक पॉलिसींच्या विक्रीसह भारतातील सर्वात वेगाने वाढणारा डिजिटल वितरक बनला आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये १००० रुपयांमध्ये खाते उघडा; दरमहा ५ हजार रुपये कमवा, कसे ते जाणूुन घ्या
या भागीदारीमुळे, लिबर्टी जनरल इन्शुरन्स आपल्या ग्राहकांना आजच्या डिजिटल युगात सर्वोत्तम संरक्षण कवच देऊन सक्षम करण्यासाठी ‘फोन पे’ सोबतचा आपला करार मजबूत केला आहे. लिबर्टी जनरल इन्शुरन्समध्ये विमा उत्पादनांचा सर्वसमावेशक संच आहे जो बाजारपेठेतील इतर विद्यमान मोटार विमा उत्पादनान पासून वेगळा आहे, असे मत लिबर्टी जनरल इन्शुरन्सचे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक रुपम अस्थाना यांनी व्यक्त केले.

सोने-चांदीमधील तेजी कायम ; जाणून घ्या आज कितीने महागले सोने
गुंजन घई, उपाध्यक्ष आणि विमा विभागाचे प्रमुख, ‘फोन पे’ या भागीदारीबद्दल बोलताना, म्हणाले, आमच्या ३२ कोटी हून अधिक वापरकर्त्यांना मोटार विमा उत्पादने देण्यासाठी लिबर्टी जनरल इन्शुरन्ससोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘फोन पे’ वापरकर्ते आमच्या प्लॅटफॉर्मवरील अनेक मोटार विमा उत्पादनांमधून निवडू शकतात आणि काही क्लिकमध्ये विमा खरेदी करू शकतात. सर्व विमा गरजांसाठी ‘फोन पे’ हे वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि ही भागीदारी त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: