‘संघात दोन ग्रुप; एक दिल्ली तर दुसरा मुंबई, विराट कोहली टी-२०तून निवृत्ती घेणार’


नवी दिल्ली: विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून आता रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विराटच्या अचानक राजीनाम्यासंदर्भातील चर्चा अद्याप थांबलेली नाही. त्याने वर्ल्डकप सुरू होण्याआधीच कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले होते. आता भारतीय संघ वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीतून बाद झाला आणि नव्या कर्णधाराची नियुक्ती करण्यात आली. यावर एका माजी क्रिकेटपटूने मोठे वक्तव्य केले आहे.

वाचा- धक्कादायक; ज्यामुळे टीम इंडियाला अपयश आले त्यावर शास्त्री म्हणाले, ते माझे काम

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपमधून पहिल्या फेरीतच बाद झाला याला कदाचित बाय बबल जबाबदार असू शकते, असे मत पाकिस्तानचा माजी फिरकीटपटू मुश्ताक अहमद याने व्यक्त केले. टी-२० संघाचे आणि आयपीएलमधील आरसीबी संघाचे नेतृत्व सोडणारा विराट लवकरच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो असे मत त्याने व्यक्त केले. जेव्हा एक यशस्वी कर्णधार मध्येच कर्णधारपद सोडून देतो तेव्हा गोष्टी स्पष्ट होतात की संघात सर्व काही ठीक नाही. मुश्ताक एवढ्यावर थांबला नाही त्याने भारतीय संघावर गंभीर आरोप केले. टीम इंडियात सध्या दोन ग्रुप आहेत एक दिल्ली आणि दुसरा मुंबई होय. मुश्ताक पाकिस्तान क्रिकेट बोर्डात पदाधिकारी आहे.

वाचा- भारतासाठी वर्ल्डकप संपला; आता खेळाडू काय करणार जाणून अपडेट

विराटने कर्णधार म्हणून वर्ल्डकपमध्ये नामिबियाविरुद्ध अखेरचा सामना खेळला. या सामन्यात भारताने विजय मिळवला. आता विराट टी-२० मधून निवृत्ती घेईल असा अंदाज पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने व्यक्त केला. विराट कोहली आयपीएलमध्ये खेळले पण टी-२० मध्ये देशाकडून जितके खेळायचे होते तितके खेळून झाले आहे, असे मुश्ताकला वाटते.

वाचा- जाता जाता रवी शास्त्रींनी पराभवाचे खापर यांच्या डोक्यावर फोडले

२०१२ नंतर भारतीय संघ प्रथमच आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारताचे आव्हान जवळ जवळ संपुष्टात आले होते. टीम इंडियाच्या वर्ल्डकपमधील खराब कामगिरीला आयपीएल जबाबदार आहे. सातत्याने मोठ्या मालिका खेळणे सोपे नसते. बायो बबलमध्ये इतके दिवस रहाणे सोपे नसते, असे तो म्हणाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: