शास्त्री गुरुजींना निरोप देताना कोहली झाला भावूक; काय म्हणाला पाहा


नवी दिल्ली: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१मधील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास सोमवारी (८ नोव्हेंबर) संपुष्टात आला. यासोबतच भारताच्या कोचिंग स्टाफचा प्रवासही या स्पर्धेसोबत संपला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यापुढे संघासोबत राहणार नाहीत. भारताने विश्वचषक स्पर्धेत नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून या तिघांना विजयी निरोप दिला, पण या महत्वाच्या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी होऊ न शकल्याबद्दल सर्वांनाच वाईट वाटेल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या तिघांना भावनिक निरोप दिला तसेच त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

वाचा-संजूला न्याय द्या; सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केला राग

विराटने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, या तिघांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. एक संघ म्हणून जतन केलेल्या आठवणी आणि तुमच्यासोबतच्या अप्रतिम प्रवासाबद्दल धन्यवाद. तुमचे योगदान खूप मोठे आहे आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहिल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

वाचा- ‘संघात दोन ग्रुप; एक दिल्ली तर दुसरा मुंबई, विराट कोहली टी-२०तून निवृत्ती घेणार’

असा राहिला प्रवास
२०१७ पासून रवी शास्त्री संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि तेव्हापासून भरत अरुण देखील संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते, तर श्रीधर त्याआधीपासून संघासोबत होते. या तिघांच्या मार्गदर्शनाखाली संघाने भरपूर यश मिळवले आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकणे हे सर्वात मोठे यश आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत दोनदा पराभूत केले. त्याचवेळी हा संघ कुठेही सामना जिंकू शकणारा संघ म्हणून उदयास आला. संघाचे गोलंदाजी आक्रमण जगातील सर्वोत्तम आक्रमणांमध्ये गणले जाऊ लागले. संघाच्या वाट्याला अपयशही आले. एकही आयसीसी ट्रॉफी न जिंकणे हे त्यापैकी एक. भारताने २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. याच न्यूझीलंड संघाने पुन्हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्येही टीम इंडियाला सेमीफायनल गाठता आली नाही.

वाचा- अफलातून कामगिरी; दोन्ही हातांनी गोलंदाजी, टी-२०मध्ये दोन दिवसात २Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: