sanjay raut : राजकीय चिखलफेक थांबली पाहिजे, महाष्ट्रावर डाग लागतोयः संजय राऊत


नवी दिल्लीः महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून सतत ‘बॉम्ब’ फोडत आहेत. मलिक यांनी एनसीबीच्या समीर वानखेडेंसह भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले आहेत. भाजपकडून नवाब मलिकांच्या आरोपांना जशास तसं उत्तर देण्यात येत आहे. दिवाळीच्या आधीपासून महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय चिखलफेक सुरू आहे. ही चिखलफेक कुठेतरी थांबली पाहिजे. राज्याच्या प्रमुखांनी यात लक्ष घालावं, असं आवाहन संजय राऊत केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेला रियाज भाटी याच्याशी फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला. तसंच भाजप नेत्यांसोबतचे काही फोटो मलिक यांनी जाहीर केले. पण रियाज भाटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासोबतचे फोटो आशीष शेलारांनी उघड केले. या आरोपांवर संजय राऊतही बोलले. कधी कोणाबरोबर काय फोटो असेल हा संबंध असल्याचा पुरावा होऊ शकत नाही. रिजाय भाटीचे फोटो पंतप्रधान मोदींसोबत आहे, गृहमंत्र्यांसोबत आहेत. कोण कोणाच्या बाजूला जाऊन उभा राहिल आणि कोण कधी कोणाबरोबर फोटो काढेल, हे सांगता येत नाही, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.

२० वर्षांपूर्वीची व्यक्ती आणि आजची व्यक्ती यात फरक आहे. भाजपचे धुलाई मशीन आहे. त्यात घातले सर्व स्वच्छ होता. सर्व गुंड, पुंड, बदमाश आणि दाऊदचा माणूस होतो. पण त्यांच्याकडे गेला की स्वच्छ होतो. राजकारणामध्ये असं कोणीही कोणाच्या संदर्भात सध्याच्या राजकारणामध्ये बोट दाखवू नये. संत सज्जनांचं आणि साधूचं राजकारण राहिलेलं नाही. निवडणुका जिंकण्यासाठी सध्या राजकारण कोणत्या थराला गेलंय हे आपण पाहतोय, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राल जो काही हळूहळू चिखलफेकीचा डाग लागतोय, तो योग्य नाही. रोज राजकीय आरोपांची चिखलफेक सुरू आहे. यांना कंटाळा कसा येत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि इतर प्रश्नांकडे पाहायला हवं. ज्यांनी याची सुरवात केली. ते आता पळून जात आहेत. नवाब मलिक यांचे काही हल्ले जोरदार आहेत. ते राजकीय की व्यक्तीगत यात पडणार नाही. पण असे भन्नाट आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करण्याची ज्यांनी परंपरा सुरू केली, त्यांच्यावर आता पळता भूई थोडी होण्याची वेळ आली आहे. पण ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणीतही प्रमुख व्यक्ती यात लक्ष घातलं पाहिजे. आणि ही रोजची चिखलफेक थांबवायला हवी. ही मजा बघण्याची वेळ नाही. महाराष्ट्रात फक्त चरस, अफू गांजाचं पिक निघतंय, रोज होणाऱ्या अटकेवरून देशातील नागरिकांना कालपर्यंत वाटत होतं. आता महाराष्ट्रात गुंड आणि दाऊदशी संबंध असलेले राजकारण होत आहे, असं जनतेला वाटतंय, असं संजय राऊत म्हणाले.

priyanka gandhi : प्रियांका गांधींची घोषणा… ‘आशा, अंगणवाडी सेविकांना दरमहा १० हजार रुपये मानधन देणार’

एसटी कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. करोनामुळे राज्याची आर्थिक स्थितीही समजून घेतली पाहिजे. पण रोज सकाळी उठून आरोप प्रत्यारोप होत आहेत. कुठेतरी याला मर्यादा घालणं गरजेचं आहे. अर्थात नवाब मलिक हे संतापातून हे सर्व आरोप करत आहेत. त्यांच्या कुटुंबावर जे काही संकट आलं होतं, ते आम्ही जवळू पाहिलं आहे. यामुळे कुणीतरी प्रमुख व्यक्तीने पुढाकार घेऊन मार्ग काढला पाहिजे, असं आवाहन राऊत यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्याचे प्रमुख आहेत, असं आपल्याला वाटतं. महाराष्ट्राच्या हिताची आणि प्रतिष्ठेची त्यांना चिंता आहे, असं राऊत म्हणाले.

kcr – arvind dharmapuri : ‘मुख्यमंत्री केसीआर यांचे राजकीय मरण जवळ, त्यांनी मोदींशी पंगा घेतला’

‘एसटी कामगारांना भाजप नेत्यांची चिथावणी, आंदोलनं आणि अटक नौटंकी’

एसटी कामगारांच्या संपावरही राऊत बोलले. भाजप नेते एसटी कामगारांना चिथावत आहेत. शिवसेना कामगार क्षेत्रातूनच जन्माला आली आहे. शिवसेनेचा पाठिराखा हा गिरणी कामगार, मजूर आणि कष्टकरी वर्ग हाच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कष्टकऱ्यांचं नेतृत्व शिवसेना करतेय. कामगारांविषयीची आमची भूमिका चुकीची आहे, हे सांगण्याची आम्हाला गरज नाही. शिवसेनेला कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे. एसटीत शिवसेनेची कामगार संघटनाही आहे. भाजपच्या काळातही एसटी कामगारांच्या याच मागण्या होत्या. फडणवीस मुख्यमंत्री असताना अर्थमंत्री मनुगंटीवार यांच्याकडे एसटी कामगार संघटनेचे नेते गेले होते. त्यावेळी मुनगंटीवारांनी त्यांना हाकलून दिलं. सरकारवर आर्थिक बोजा आहे. संकट आहे. शिवसेने कायम कामगारांच्या मागण्यांची आस्था कायम आहे. कारण कामगारांच्या लढ्यातूनच शिवसेनेचा जन्म झाला. यामुळे आम्हाला कामगारांचे प्रश्न शिकवण्याची गरज नाही. आंदोलनं करणं, अटक करणं ही भाजपची नौटंकी आहे. एसटी कामगारांनी भाजप नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. एसटी कामगारांनी नुकसान करून घेऊ नये, असा आरोप संजय राऊत यांनी केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: