VIDEO : जोधपूर अपघाताचा अंगावर शहारे उभे करणारा व्हिडिओ


हायलाइट्स:

  • जोधपूरच्या पाल रोडवरील घटना
  • भयंकर अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
  • अपघातात गाडीनं तब्बल ११ जणांना दिली धडक

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरच्या एम्स रोडवर एक भयंकर अपघात घडलाय. या अपघाताची अंगावर शहारा आणणारी दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या अपघातात एका अनियंत्रित वेगानं आलेली ऑडी गाडी झोपड्यांमध्ये घुसली. एकामागोमाग तब्बल ११ जणांना गाडीनं उडवलं. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी सकाळी ११.०० वाजल्याच्या सुमारास जोधपूरच्या चौपासनी हाऊसिंग बोर्ड परिसरात हा अपघात घडला. गाडीचा वेग इतका होता की अपघातानंतर ही गाडी रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या झोपड्यांत बसलेल्या अनेक लोकांच्या अंगावरून गेली.

या अपघातात एका १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला आणि एका बालकालाही या अपघातात आपले प्राण गमवावे लागले. इतर जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शास्त्रीनगर परिसरातील नंदनवन ग्रीनचे रहिवासी असलेले ५० वर्षीय अमित नागर यांचं आपल्या गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात घडला. पाल रोडहून एम्सकडे जाताना पेट्रोल पंपाजवळ अचानक हा अपघात घडला.

UP Crime: चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू
Ahmedabad double Murder: पैशांसाठी वृद्ध दाम्पत्याची ‘त्यांनी’ केली हत्या, फ्लॅटमध्ये मिळाले अवघे ५०० रुपये
अनियंत्रित झालेल्या गाडीनं अगोदर एका अॅक्टिव्हाला मागून ठोकर दिली. यानंतर आणखी एका बाईक आणि एका स्कूटीला धडकल्यानंतर ही गाडी थेट झोपड्यांत शिरली. झोपडीतून बाहेर पडत असलेल्या एका सायकलस्वारालाही गाडीनं उडवलं. त्यानंतर गाडी थांबली.

या अपघातानंतर आरोपी अमित नागर यांनी थेट बासनी पोलीस स्टेशन गाठलं. ब्रेक आणि एक्सलेटर दरम्यान पाय अडकल्यानं आपलं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याचं नागर यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत विमानतळाहून थेट एम्स रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गंभीर जखमींना एक लाख रुपये तर इतर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री मदतनिधी कोषातून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय.

Indian Railway: रेल्वेकडून सर्वसामान्यांना दिलासा, करोनाकाळातील दरवाढ कमी होणार
epfo alerts account holder : EPFO च्या खातेदारांनो सावधान… अन्यथा PF Account होईल रिकामे!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: