गुंतवणूकदारांची दिवाळी; ‘नायका’च्या शेअरची दमदार एंट्री, पदार्पणात एक लाख कोटींना गवसणी


हायलाइट्स:

  • आज बुधवारी नायकाच्या शेअरने जोरदार एंट्री घेतली.
  • या बंपर नोंदणीनं गुंतवणूकदार मालामाल झाले.
  • कंपनीचे बाजार भांडवल पदार्पणातच एक लाख कोटीवर गेले.

मुंबई : नफावसुलीने निर्माण झालेल्या नकारात्मकेला दूर सारत आज बुधवारी नायकाच्या शेअरने जोरदार एंट्री घेतली. नायकाची पालक कंपनी असलेल्या ‘एफएसएन ई कॉमर्स व्हेंचर्स’ हा शेअर इश्यू प्राइसच्या तब्बल ७९.३८ टक्क्यांनी वधारून २०१८ रुपयावर लिस्ट झाला. या बंपर नोंदणीनं गुंतवणूकदार मालामाल झाले. त्याचबरोबर कंपनीचे बाजार भांडवल पदार्पणातच एक लाख कोटीवर गेले. अलीकडच्या आयपीओमध्ये अशी कामगिरी करणारी नायका ही पहिलीच कंपनी ठरली.

शेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टीला तेजीची हुलकावणी , बाजारात लाल निशाण
नायकाचा आयपीओ २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या दरम्यान खुला झाला होता. कंपनीने २.६४ कोटी शेअरची विक्री करण्याचे जाहीर केले होते. मात्र या योजनेला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला. आयपीओमध्ये तब्बल २१६.५९ कोटी शेअरसाठी गुंतवणूकदारांनी बोली लावली होती. त्यामुळे लिस्टिंग जोरदार होणार असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता. कंपनीचा शेअर गुरुवारी सूचीबद्ध होणार होता मात्र एक दिवस आधीच ‘एफएसएन ई कॉमर्स व्हेंचर्स’ बाजारात एंट्री घेतली.

आज बीएसईवर २००१ रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओसाठी प्रती शेअर ११२५ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. एनएसईवर २०१८ रुपयांना ‘एफएसएन ई कॉमर्स व्हेंचर्स’ चा शेअर खुला झाला. इश्यू प्राईसच्या तुलनेत ही किंमत तब्बल ७९.२८ टक्के अधिक आहे. कंपनीच्या प्रमुख फाल्गुनी नायर यांनी ‘एनएसई’मध्ये घंटानाद करुन शेअर लिस्टींग केले.

सोनं झालं स्वस्त, चांदी महागली ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
‘एफएसएन ई कॉमर्स व्हेंचर्स’चे आज बाजार भांडवल एक लाख कोटींवर गेले. सौंदर्य प्रसाधने, ब्युटी आणि फॅशन ब्रॅंड्सचे आघाडीची ऑनलाईन बाजारपेठ म्हणून नायकाची ओळख आहे. आर्थिक २०२१ मध्ये कंपनीने १७ लाख उत्पादनांची डिलिव्हरी केली. देशातील ४० शहरांमध्ये कंपनी ८० स्टोअर्स सुद्धा चालवते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: