राजधानीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा Anti-Terrorism and Violence Day’ celebrated in the capital

नवी दिल्ली,Team DGIPR ,मे 21,2021- देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 30 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून सोमवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली .

    कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्याम लाल गोयल यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री गोयल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश आडपावार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: